एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!

Prakash Ambedkar : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

Prakash Ambedkar Press Conference : आगामी लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे भाष्य केले आहे. सध्या विविध संघटनांची चर्चा सुरु असून दोन एप्रिलपर्यंत भाजपाविरोधी (BJP) आघाडी तयार करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.   

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगेंशी (Manoj Jarange Patil) लोकसभेसंदर्भात चर्चा झाली आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांच्याशी लोकसभेसंदर्भात भेट घेतली होती. त्यांचा लोकसभेबाबत डेटा आज येईल आणि पुढची वाटचाल देखील येईल, असं मी मानतो. लोकसभेत आमचा प्रयत्न होता की, भाजपाविरोधात मजबूत आघाडी उभी राहावी. मात्र दुर्दैवाने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्यापद्धतीनं उभी राहत नव्हती, अशी परिस्थिती होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटनांशी मी बोलत आहेत. 2 एप्रिलपर्यंत भाजपविरोधातली आघाडी उभी राहिलेली दिसेल. ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनांचा अजेंडा देखील समोर येतोय, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर कुठल्या संघटनांना सोबत घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन तारखेला इतर संघटना कोणत्या ते कळेल

दोन तारखेपर्यंत नेमकं या संघटनांबरोबर बसून आम्ही जे करणार आहोत ते कळेल. आता दुसऱ्या फेजला सुरुवात झाली आहे. दोन तारखेला इतर संघटना कोणत्या आहेत ते कळेल. महाविकास आघाडीसोबतची चर्चा अद्यापही बंद नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. 

संजय महाविकास आघाडी मे बिघाडी लगा रहा है

'कल की बात संजय की बात थी', संजय अलग है और महाविकास आघाडी अलग है, संजय महाविकास आघाडी मे बिघाडी लगा रहा है. आमच्याकडे तीनच जागांचा प्रस्ताव होता. आम्ही कोणतेही दरवाजे बंद केलेले नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी आणण्याचा प्रयत्न संजय करतोय, असा हल्लाबोल त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला आहे. काही लोकं लढायला तिकडे तयार नाही. आम्ही भाजपला फ्री हॅण्ड नाही देऊ शकत. त्यामुळे आम्ही उमेदवार दिले आहेत. जोपर्यंत सुभाष देसाईंबरोबर बोलत होतो तोपर्यंत सकारात्मक चाललेलं होतं. मात्र कोणीतरी कोणाला वापरायचं असा हिशोब सुरु झाला, अशात भाजपला थांबवू शकत नाही. काहींशी बोलायचं नाही, हे योग्य नाही, असा निशाणादेखील त्यांनी संजय राऊतांवर साधला.

आमचे दरवाजे अद्यापही उघडे आहेत

जे आले पाहिजे त्यांना घेऊन आम्ही काही उभं करणार आहोत. आमचे दरवाजे अद्यापही उघडे आहेत. दोन एप्रिल रोजी आम्ही सर्व काही उघड करु. तिन्ही पक्षांचे स्वत:मध्येच जमत नव्हते.  कोंबडा यांनी झाकून ठेवलेला होता आणि आता सर्व उघड होतंय. सकल मराठा समाजातून नावं द्यावी असं म्हटलेले आहे आणि एकच उमेदवार येईल असं दिसतंय. आम्ही पहिल्या टप्प्यातील उमेदवार दिले आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर नाही सोडू शकत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

...तर शासन सुरळीत चालेल 

ते पुढे म्हणाले की, खासगीकरणाविरोधात भूमिका घेतली पाहिजे.  कंत्राटीपद्धतीवर कर्मचारी लागले आहे. त्यात ५८ वर्षाआधी त्याला काढायचं नाही रिटायर करायचं नाही, असा अजेंडा ठरतोय. महाराष्ट्रात चौदा लाख सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत.  या संख्येत आपण आणखी वाढ केली पाहिजे आणि २२ लाखांपर्यंत ती गेली पाहिजे. तर शासन सुरळीत चालू शकेल, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.  

दोन्ही बाजूनं ग्राहक लुटले जाताय

२२ लाखांपर्यंत घेऊन गेलं तरी नोकरी सर्वांनाच मिळेल, अशी परिस्थिती नाही.  त्याच ॲग्रो इन्डस्ट्रीजचे मेगा प्रकल्प होतायत. त्याऐवजी जसे पिठाची चक्की होती त्याच धर्तीवर मायक्रो ॲग्रो इंडस्ट्रीजवर भर दिला पाहिजे. केंद्र शासन एमएसपी जाहीर करते.  शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता दुसऱ्या बाजूला आहे. दोन्ही बाजूनं ग्राहक लुटले जाताय, अशी परिस्थिती आहे.  यावरचा तोडगा आहे त्यात हमीभावाचा कायदा केला तर त्यात लुट होते त्यात शिक्षा होऊ शकते. राज्यातले असणारी महत्त्वाची पिकं ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उसाची आहे. खान्देश, विदर्भ कापूस सोयाबीन आहे. वरचा विदर्भ आणि कोकणात तांदळाचं पिक आहे.  सोयाबीन पिक 100 टक्के एक्सपोर्ट होतो, अशी परिस्थिती आहे. ज्याला 5 हजारांचा भाव असला पाहिजे.  इथेनॉलचा देखील रेट बघावा, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Sharad Pawar On VBA : मविआचं ठरलं? वंचितला सोबत घेणार नाही? शरद पवारांच्या एका वाक्यामुळे चर्चेला उधाण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget