एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची वेळ यावेळी योग्य नाही. रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला यश मिळणार नाही. त्यासाठी निवडणूक लढवा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

अकोलासरकार आर्धवट काम करतात आणि अर्धवट कामे सोडतात, त्याचे हे परिणाम आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना आजपासून पुन्हा उपोषण करावे लागत आहे, आहे त्यावर मी इतकेच बोलेल की, या आंदोलनाची वेळ यावेळी योग्य नाही. आरक्षणासंदर्भात  (Maratha Reservation) त्यांनी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांना आरक्षण मिळाले आहे. आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा. तर त्यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छितो की आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही. ते जर मिळवायचे असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावे लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी लागेल. तरच ते हा प्रश्न निकाली काढू शकतात, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.  

ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे

पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी जी भूमिका मांडली आहे, ज्यामध्ये ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट जे करायचं आहेत ते वेगळे, अशी भूमिका त्यांनी घेतले पाहिजे. तेव्हा कुठे त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश येऊ शकतं, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे.

याबाबत जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  

भाजपची दादागिरी ही काही आजची नाही

राज्यात सध्या अंदाधुंदी चालली आहे. मी अगोदरचं म्हणालो होतो, राज्यात जसे जसे इलेक्शन जवळ येतील, तसं राज्यात अराजकता आपल्याला दिसेल. म्हटल्या प्रमाणे आज त्याचं चित्र समोर आहे. सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलं आहे किंवा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून एकमेकांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी चालले आहे. भाजपची दादागिरी ही काही आजची नाही, ही आधीपासूनच आहे असे देखील  प्रकाश आंबेडकर म्हणले. सत्ता आता पैसे कमवण्याचं फार मोठं साधन झालं आहे. चोरी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, असं असताना मला सुद्धा चोरी करता आली पाहिजे, मला सुद्धा पैसे कमवता आले पाहिजे, अशातूनच ही अंदाधुंदी चालली आहे. त्यातूनच गोळीबार, हत्येचे प्रकरण घडत आहेत. यात नवीन काहीही नाही. याचा अंदाज मी आधीच लावलेला होता असे देखील आंबेडकर म्हणाले. 

पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध

मतभेद हे चालत राहतात. मात्र पत्रकारांवर अशा पद्धतीने हल्ले होता कामा नये. टीका ही होतच राहते, मात्र टीकेला उत्तर हे एखाद्या हिंसक वृत्तीने कोणी देता कामा नये. जो हिंसक प्रकार घडला आहे, त्याचा मी निषेध करतो. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाविषयी ते बोलत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dagdusheth Halwai Atharvashirsha : पुण्यात दगडुशेठ हलवाई गणपती मंडपात सामूहिक अथर्वशीर्ष पठणMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP MajhaAjit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चाAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Embed widget