एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!
कोल्हापूर: पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा कोल्हापुरात सुरु झाली आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं.
राज्यातील हे पहिलंच पासपोर्ट पोस्ट ऑफिस कार्यालय ठरलं आहे. कसबा बावड्यातील पोस्ट ऑफिसमध्ये आता पासपोर्ट मिळणार आहेत.
7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
या कार्यालयाच्या माध्यमातून जलद सेवा दिली जाईल, असं परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितलं. पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला www.passportindia.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागेल. याद्वारे दररोज 50 अर्ज स्वीकारले जातील. त्या अर्जांची पोस्टातच छाननी,आणि कागदपत्रे तपासून पासपोर्ट वितरित केले जातील. कोपुरातील पोस्ट ऑफिसमध्ये यापुढे दररोज 50 पासपोर्ट काढले जाणार आहेत. ही सेवा सुरु झाल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील नागरिकांना आता या पुढे पुण्याला पासपोर्ट साठी चकरा माराव्या लागणार नाहीत. संबंधीत बातम्या7 दिवसात पासपोर्ट बनवण्यासाठी सोप्या टिप्स
औरंगाबाद, बीडमध्ये लवकरच पासपोर्ट केंद्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement