एक्स्प्लोर
धावत्या रेल्वेखाली आलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं

पिंपरी : धावती रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आलेल्या एका तरुणाची दोन पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. लोणावळा स्टेशनवरील या घटनेची थरारक दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसटीहून सुटलेल्या नागरकोईल एक्स्प्रेस लोणावळा स्थानकात पोहोचली. पण धावती गाडी पकडत असताना या तरुणाचा तोल गेला आणि तो गाडीच्या खाली जाऊ लागला. हा तरुण सुमारे 100 मीटर रेल्वेसोबत फरफटत गेला. सुदैवाने तरुणाच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीची याचना रेल्वे पोलिसांनी ऐकली. तर यादरम्यान हा सर्व प्रकार गाडीच्या मोटरमनच्याही लक्षात आला. त्यामुळे त्याने त्वरीत गाडी थांबवली. त्यानंतर सचिन भोई आणि सुमीत पाल या दोन्ही पोलिसांनी या तरुणाला सुखरुप बाहेर काढलं. हा तरुण या प्रकारानंतर इतका भांबावलेला होता की तो आपलं नावही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं. केवळ दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























