एक्स्प्लोर
Advertisement
कोपरगावात चार कत्तलखान्यांवर छापा, हजारो किलो गोमांस जप्त
याप्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर : महाशिवरात्रीच्या दिवशी पोलिसांनी कोपरगावमध्ये मोठी कारवाई केली आहे. कोपरगावातील चार अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकत 90 लाखांचा मुद्देमाल आणि काही जिवंत जनावरं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 19 हजार 500 किलो गोमांस, 337 जिवंत जनावरांसह 3000 गोवंश जनावरांची कातडीही जप्त करण्यात आली.
कत्तलखाना चालवणाऱ्यांकडून एक टेम्पो, दोन पिकअपसह 8 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या एवढ्या मोठा कारवाईने अवैध कत्तलखाना चालवणारांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement