एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गावठी दारुचे अड्डे नष्ट करण्यासाठी 'ड्रोन'चा वापर
भाईंदर (ठाणे) : भाईंदर पोलिसांनी भाईंदर पश्चिम परिसरात असलेला राई, मूर्धा, मोर्वा आणि उत्तन या गावांजवळच्या जंगलात ड्रोनचा वापर करुन गावठी दारुच्या अड्ड्यांवर कारवाई केली. काल केलेल्या कारवाईत दोन हातभट्ट्यांवर कारवाई केली असून, एकाच महिन्यात भाईंदर पोलिसांनी 16 हातभट्ट्यांवर कारवाई केली.
हातभट्ट्या पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. त्यातील हजारो लीटर दारुही पोलिसांनी नष्ट केली आहे. भाईंदर व उत्तन सागरीय पोलिस ठाणे परिसरात मोठं जंगल आहे. या जंगलात काहीलोक हातभट्टीच्या माध्यामातून गावठी दारु तयार करत होते. भाईंदर पोलिसांनी त्यांच्या विरोधात महिनाभरापासून मोहीम राबवली आहे. 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गावठी दारु अड्डे नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर केला.
घनदाट जंगल असल्यामुळे पोलिसांनी ड्रोनचा वापर करुन जंगलात हातभट्ठी दारु बनवण्याच्या जागा शोधून काढल्या आणि त्या जागेवर पोलिसांनी स्वतः जाऊन हातभट्ठ्या नष्ट केल्या.
यापूर्वीही भाईंदर पोलिसांनी या भागात बोट आणि जंगलात गूगलच्या वापर करुन हातभट्ठीवर कारवाई केला होती. भाईंदर पोलिसांनी हातभट्ठी दारुच्या विरोधात प्रखरपणे मिशन सुरु केले आहे. परंतु जंगलात जागा हुडकण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
या कारवाईमुळे हातभट्टी मालकांवर आता पोलिसांचा वचक बसला आहे. आतापर्यंत पोलिसांनी एका महिन्यात या भागात 16 जागा वर कारवाई करुन हजारो लिटरबनावटी दारु नष्ट केली आहे आणि 14 मालकांवर गुन्हा दाखल करून कारवाईही केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement