एक्स्प्लोर
पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे अनंतात विलीन
![पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे अनंतात विलीन Police Constable Vilas Shindes Funeral At Satara पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे अनंतात विलीन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/01030703/Vilas_Shinde_Funeral-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : मुंबईच्या वाहतूक विभागातील पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या पार्थिवावर आज साताऱ्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विलास शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी शिरगावच्या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
विलास शिंदेंची मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा, कुटुंबीयांची माहिती
23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. आठ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि काल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली.![Vilas_Shinde_Funeral_2](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/01083652/Vilas_Shinde_Funeral_2.jpg)
मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन
विलास शिंदेंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी काल विविध राजकीय नेत्यांनाही हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी वरळीत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन केलं.मारहाणीत जबर जखमी झालेल्या पोलिसाच्या भेटीला राज ठाकरे
दरम्यान शिंदेंना झालेल्या मारहाणीविरोधात आज सर्वपक्षीय वरळी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)