एक्स्प्लोर

अखेर डीएसकेंच्या घरी पोलीस पोहोचले!

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती सुरु केली आहे.

पुणे: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या अडचणीत भर पडली आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती सुरु केली आहे. डीएसकेंच्या मुंबई आणि पुण्यातील घरी पोलीस पोहोचले असून, तपासणी सुरु आहे. डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणुकदारांचे पैसे थकविल्याचा आरोप आहे. कालच अनेक गुंतवणुकदारांनी पुण्यात डीएसकेंविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर आज डीएस कुलकर्णींच्या पुणे आणि मुंबईतल्या ठिकाणावर कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील निवासस्थानी, जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयं, डीएसके विश्वमधील त्यांचं घर आणि मुंबईतल्या कार्यालयावर पोलीस दाखल झाले आहेत. डीएसकेंविरोधात जवळपास तीनशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना ताब्यातही घेतलं जाऊ शकतं. मोकळ्या जागेत टेबल मांडून तक्रारी नोंदवल्या गुंतवणूकदारांची मोठी संख्या पाहून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल – खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या. पोलिसांच्या मते, डीएसकेंकडे विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक आहे. ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गेले अनेक महिने डीएसकेंकडे पैसे गुंतवणारे लोक पैसे परत मिळावेत यासाठी कार्यालयाबाहेर खेटे घालत होते. मात्र डीएसके पैसे परत करु शकत नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला डीएसकेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. २०१४ पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत. संबंंधित बातम्या डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार  डीएसकेंच्या अडचणीत वाढ, पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget