एक्स्प्लोर
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो-2, मेट्रो-4 प्रकल्पांचा शुभारंभ
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न झालं. यानंतर पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचंही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
LIVE TV : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो-2, मेट्रो-4 प्रकल्पांचा शुभारंभ
LIVE TV : आधीचं सरकार फक्त शिवस्मारकाच्या घोषणा करत होतं - मुख्यमंत्री
LIVE : आई तुळजाभवानीला साकडं घालतो, मी शिवा होऊ शकत नाही, पण जिवा होण्याची शक्ती मला द्यावी : मुख्यमंत्री
LIVE : सिंधुदुर्ग बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी जलपूजन केलं होतं, आज महाराजांचे सेवक म्हणून पंतप्रधान मोदींनी शिवस्मारकाचं पूजन केलं : मुख्यमंत्री
LIVE : शिवस्मारकातून सर्व क्षेत्रांसाठी प्रेरणा मिळेल - मुख्यमंत्री
LIVE : भारत देश शिवस्मारकामुळे ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री
LIVE : भारत देश छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री
LIVE TV : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु
LIVE : शिवाजी महाराज की जय बोलल्यावर मुडदा काय दगड पण बोलेल : उद्धव ठाकरे
LIVE : 'शिवसेनेचा वाघ आला', उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी शिवसैनिकांच्या घोषणा
LIVE : मोदीजी, महाराष्ट्रातील गड-किल्ले दिल्लीतील पुरातत्त्व खात्याकडून राज्य सरकारकडे द्या - उद्धव ठाकरे
LIVE : शिवस्मारक बांधणं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासारखं आहे : उद्धव ठाकरे
LIVE : शिवरायांना वंदन करण्यासाठी इथे आलो आहे - उद्धव ठाकरे
LIVE : मी इथे शिवरायांना वंदन करण्यासाठी आलोय : उद्धव ठाकरे
LIVE : शिवाजी महाराज हे केवळ छत्रपती किंवा महाराज नाहीत, ते महाराष्ट्राचे दैवत आहेत - उद्धव ठाकरे
LIVE : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
LIVE : महाराष्ट्रात 3 लाख कोटींचे रस्ते बांधणार : नितीन गडकरी
LIVE : नरेंद्र मोदी सर्वात मोठे शिवभक्त : नितीन गडकरी
LIVE : भारताला समृद्ध करण्याचं पंतप्रधान मोदींनी आव्हान स्वीकारलं आहे - नितीन गडकरी
LIVE : सुखी, शक्तीशाली हिंदुस्तान निर्माण करण्याचं ध्येय आहे - गडकरी
LIVE : बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, राज्यात शिवशाही स्थापन झाली पाहिजे - नितीन गडकरी
LIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण सुरु
LIVE : पंतप्रधान मोदींनी रेल्वेला जी प्राथमिकता दिली, ती आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी दिली नव्हती- सुरेश प्रभू
LIVE : मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी करणार - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
LIVE : बीकेसीत घोषणाबाजीमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ, मोदी मोदी सोबत बाळासाहेबांचाही जयजयकार
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीला पोहोचले, थोड्याच वेळात जाहीर सभा https://goo.gl/nvZkdV
--------------------
LIVE : पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न, भूमिपूजनानंतर पंतप्रधान गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना
LIVE : पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न
LIVE : महाराष्ट्रभरातून आलेल्या जल-माती शिवस्मारकाच्या नियोजित जागेवर अर्पण
LIVE : पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकासाठी जलपूजन आणि भूमिपूजन संपन्न
LIVE : शिवस्मारकाच्या नियोजित जागेची पंतप्रधान मोदींकडून पाहणी
LIVE : महाराष्ट्रातून आणलेल्या माती आणि पाण्यानं जलपूजन होणार, सोबतच भूमिपूजनही होणार
LIVE : काही क्षणातच अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य शिवस्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
LIVE : शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही उपस्थित
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी चौपाटीवरुन रवाना
LIVE : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन
LIVE : पंतप्रधान मोदी हॉवरक्राफ्टने शिवस्मारकाच्या ठिकाणी पोहोचणार
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गिरगाव चौपाटीवर
-----------------------
LIVE : नोटाबंदीचा आता त्रास, मात्र त्याचे परिणाम दूरगामी : नरेंद्र मोदी
LIVE : टीकाकारही आज आमच्या विकासाच्या वेगाला मानू लागले आहेत : नरेंद्र मोदी
LIVE : जीएसटी लवकरच सत्यात येणार : पंतप्रधान मोदी
LIVE : रसायनीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
LIVE: पनवेलमध्ये हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीच्या कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांनी पंतप्रधानांना लाल झेंडे दाखवले
LIVE : सेबीच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन
LIVE : पंतप्रधान मोदी पनवेलमध्ये दाखल, पाताळगंगा इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं उद्घाटन करणार
LIVE : गिरगाव चौपाटीवर नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार, मात्र त्यांच्यात 'संवाद' होण्याची शक्यता कमी
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन
----------------------
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचं तसंच पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
या कार्यक्रमांना पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यावर उपस्थित राहणार आहेत.
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
याशिवाय मुंबईतील बीकेसी विविध प्रकल्पाचं भूमिपूजन तसंच पनवेलमध्ये संस्थेचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. नरेंद्र मोदींच्या आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर रात्री आठपर्यंत मोदींचे विविध कार्यक्रम आहेत. रात्री आठ वाजता ते दिल्लीकडे रवाना होणार आहे.VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!
शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरुन शिवसेना नाराज असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन उरकलं असलं तरी, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत मोदी मेट्रोचं भूमिपूजन करतील. मुंबईच्या अरबी समुद्रातील 16 हेक्टर आकाराच्या खडकावर शिवस्मारक साकारण्यात येणार आहे. एकूण 3600 कोटी इतका खर्च या स्मारकाला येणार आहे. स्मारकासोबत शिवकालीन इतिहास आणि अनेक अद्यायावत सुविधा याठिकाणी असतील.मोदींआधीच काँग्रेसकडून पुणे मेट्रोचं भूमिपूजन संपन्न!
मुंबई-पुण्यात मोदी काय काय करणार? सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान मोदी मुंबई विमानतळावर दाखल, पनवेलकडे रवाना दुपारी 12 ते 1 वाजता पनवेलमधील पाताळगंगा इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन दुपारी 1.35 वाजता राजभवनात स्नेहभोजन दुपारी 2.50 शिवस्मारकाचं भूमिपूजन दुपारी 3.05 वाजता गिरगाव चौपाटीहून हॉवरक्राफ्टने राजभवनला पोहोचतील दुपारी 3.50 वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन संध्याकाळी 4.55 वाजता बीकेसीतून रवाना संध्याकाळी 6 वाजता मुंबई विमानतळावरुन पुण्याकडे रवाना संध्याकाळी 7 वाजता पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल संध्याकाळी 7.30 वाजता पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे रवाना संबंधित बातम्यापवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!
शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा
कितीही विरोध झाला तरी शिवस्मारक कुणीही रोखू शकत नाही : मुख्यमंत्री
शिवमय नव्हे भाजपमय, शिवस्मारकाच्या कलशयात्रेवर मेटे नाराज
'शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा' शिवसेनेची पोस्टरबाजी
मच्छिमारांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश
श्रेय घ्यायचं असेल तर ‘राम मंदिर’ उभारुन घ्या, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement