एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नी अटकेत
साधारण चार वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा असा छळ केल्याचं आरोप सासूने केला आहे.
पिंपरी चिंचवड : पतीने पत्नीचा छळ केला, त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटकही केली आहे.
जय तेलवानी असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव असून अटकेतील पत्नीचं नाव तृप्ती तेलवानी आहे. मागील महिन्यात 13 नोव्हेंबरला जयने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबीयांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत तृप्तीला अटक केली.
जय तेलवानी यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, "तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती. यासाठी तिने जयला कर्जही काढायला भाग पाडलं होतं. पैशांची पूर्तता न केल्यास ती पतीला शिवीगाळ करुन मारहाण करत असे. तसंच स्वतःचं बरं-वाईट करुन घेण्याची धमकीही देत असे. नंतर तिने कहरच केला होता. जयच्या एका व्हिडीओचे टिक-टॉक (दुसऱ्याचा आवाज देऊन) करुन, तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं भासवले. हा व्हिडीओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे."
साधारण एक वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा असा छळ केल्याचं आरोप सासूने केला आहे. जयने जगाचा निरोप घेतला तर तृप्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement