एक्स्प्लोर
Advertisement
परभणी महानगरपालिकेत मित्राचा विजय, अत्यानंदाने एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
या विजयानंतर MIM च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली. या रॅलीत सय्यद अब्दुल कदिर सय्यद हे देखील आनंदाने सहभागी झाले होते.
परभणी : परभणी महानगपालिकेतील प्रभाग क्र 11 च्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यात एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. या विजयानंतर सुरु असलेल्या जल्लोषात नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या मित्राचा अत्यानंदाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषात नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचे 52 वर्षीय मित्र सय्यद अब्दुल कदिर सय्यद यासिन यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने विजयाच्या आनंदावर विरजन पडले.
काल शहरातील कल्याण मंडप येथे मनपाच्या 2 जागांसाठीची मतमोजणी झाली ज्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून MIM च्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांना विजय घोषित केलं. या विजयानंतर MIM च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली. या रॅलीत सय्यद अब्दुल कदिर सय्यद हे देखील आनंदाने सहभागी झाले होते.
याच आनंदात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना मित्राच्या या विजयाचा खुप आनंद झाला होता निवडणुकीत ते सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते त्यामुळे ते विजयी झाल्याचा अत्यानंद त्यांना झाला त्यातूनच ही दुर्देवी घटना घडल्याचे समजते.
परभणी महानगरपालिकेतील दोन, सोनपेठ नगरपरिषदेतील एक आणि मानवत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. ज्यात परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, सोनपेठमध्ये काँग्रेस, मानवतमध्ये भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं.
परभणी महापालिकेतील प्रभाग क्र 3 चे शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांचे निधन झाले होते. तर प्रभाग क्र 11 मधील काँग्रेसचे नईमोद्दीन यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या दोन्ही जागांसाठी काल पोटनिवडणूक झाली. ज्यात वार्ड क्रमांक 11 मध्ये एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे विजयी झाल्या.
तसंच मानवत नगरपालिकेतील शिवसेनेच्या अध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने इथेही पोटनिवडणूक झाली होती. ज्यात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. एस एन पाटील यांनी विजय मिळवला.
तर सोनपेठ नगरपरिषदमधील प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका कांताबाई कांदे यांचं निधन झाल्याने रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण खरात यांचा विजय झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement