एक्स्प्लोर

वनगांऐवजी सावरांचं निधन झाल्याचा उच्चार, दानवे पुन्हा गडबडले!

महत्त्वाचं म्हणजे यावेळी विष्णू सावराही तिथे उपस्थित होते.

पालघर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाषणादरम्यान पुन्हा एकदा गडबडले. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचं निधन बोलण्याऐवजी विष्णू सावरा यांचं निधन झाल्याचं ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी विष्णू सावराही तिथे उपस्थित होते. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तलासरी इथे सभा घेण्यात आली. या सभेसाठी दानवेंसोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मनिषा चौधरी ,आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधताना रावसाहेब दानवे यांनी चिंतामण वनगा यांच्या निधनाऐवजी विष्णू सावरांचं निधन असा उल्लेख केला. यानंतर उपस्थितांनी त्यांना चुकीची जाणीव करुन दिली. तरीही भाषणाच्या शेवटी सावरांचे कुटुंबीय तिकडे गेले तरी फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात लढाई रंगण्याची शक्यता आहे. पालघरमधील भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाहा काय म्हणाले दानवे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget