एक्स्प्लोर
ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
राज्यातील कडक निर्बंधामुळे अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नाकाबंदीत गाड्यांना अनेक वेळ तात्कळत थांबवण्यात येतं आहे.

प्रतिकात्मक फोटो
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान या परिस्थितीत या सर्वांची माल वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. राज्यांतर्गत तपासणी नाक्यांवर वाहतूक, परिवहन आणि पोलिस प्रशासनाकडून मालवाहतूक वाहनांच्या चालकांची आणि मालकांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या बाल मल्कित सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे.
राज्यातील वाहतुकदारांचे नायट्रोजनचे टॅंकर ऑक्सिजन टॅंकरमध्ये परावर्तित होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडून कडक पावले उचलली आहेत. मात्र असं असताना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या चालकांना देखील अनेक वेळ तपासणी नाक्यांवर प्रशासन थांबवत असल्याची माहिती वाहतूकदारांनी दिली आहे. ऑक्सिजनचे टँकर चालवणाऱ्या चालकांची संख्या कमी आहे. त्यात चालक देखील कोरोनाबाधित होत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करताना अडचणी येत असल्याचं संद्धू रोडवेजचे सुखविंदर संद्धू यांनी सांगितलं आहे.कडक निर्बंधांनंतर यातील अनेक चालक आपल्या गावी जात असल्यानं देखील मोठी चिंता सतावते आहे.
राज्यातील कडक निर्बंधामुळे अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नाकाबंदीत गाड्यांना अनेक वेळ तात्कळत थांबवण्यात येतं आहे. त्यात उपहारगृह, वाहनांसाठी लागणारे वर्कशॉप आणि स्पेअर पार्टची दुकाने देखील बंद असल्यानं चालकांचे देखील हाल होत आहे. मध्यप्रदेशात भाज्यांची ने-आण करणाऱ्या चालकाच्या गाडीसमोर पोलीस आल्याने नुकसान झाल्यानंतरचा व्हीडिओ व्हायरल झाल्याचंही बघायला मिळाला.
ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक विना-अडथळा व्हावी, हे सुनिश्चित करा, असे निर्देश आज पंतप्रधानांनी दिले आहेत. सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक जलद आणि विना अडथळा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने या गाड्यांना परवाना नोंदणीतून सवलत दिली आहे. वाढीव मागणीनुसार, आवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत गरजूंपर्यंत पोचावा यासाठी या सर्व टँकर्सची वाहतूक 24 तास सुरु राहील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि वाहतूकदारांना दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
