एक्स्प्लोर

कोल्हापूरकरांचा नाद खुळा! लग्न सोहळ्यासाठी अनोखी शक्कल; सोशल डिस्टन्ससह सर्व नातेवाईकांची हजेरी

कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूरमध्ये एक लग्न अनोख्या पद्धतीने पार पडले. या विवाह सोहळ्याचं कौतुक आता सर्वच थरातून होत आहे.

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यंदा होणारी अनेक लग्नही पुढं ढकललीत. मात्र, अशा परिस्थितीत अनोखी शक्कल लढवत कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडीत एक लग्न झालं. या विवाहाला प्रत्यक्षात जरी कमी लोक उपस्थित असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नातेवाईकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे ज्यांना आहेर करायचा आहे, त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन नवदाम्पत्याकडून करण्यात आले. त्यामुळे या विवाहाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.

सीआरपीएफमध्ये नोकरी करत असलेल्या अभिजीत दोरगुडे याचं लग्न रूपाली निर्मळकर हिच्याशी ठरलं होत. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे सगळीच अडचण. मात्र, त्यावर अनोखी शक्कल लढवत अगदी कमी लोकांमध्ये हा विवाह सोहळा उरकला. त्यासाठी पै पाहुण्यांना निमंत्रण व्हाट्सअॅपवर देण्यात आलं. तर त्यांना फेसबुक लाईव्हवर विवाहात सहभागी होण्याचा आग्रह केला. नातेवाईकही आनंदाने सहभागी झाले. फेसबुकवरच शुभेच्छाही दिल्या अन् मोबाईलवर अक्षताही टाकल्या. या विवाह सोहळ्यासाठी ज्यांना आहेर करायचे होते त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अकांऊट नंबर देण्यात आला होता. या माध्यमातून कोरोनाशी लढाईला हातभारही लावला. या अनोख्या लग्नाने गर्दी करणाऱ्यांना नवीन आदर्श घालून दिला.

आनंदाची बातमी! कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

कोरोनामुळे घरगुती विवाह कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा फटका विवाह सोहळ्यांना बसत असून अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. संचारबंदीमुळे दोनवेळा लग्नाची मुहूर्त चुकल्याने लग्नाच्या तिसऱ्या वेळी नववधु थेट दुचाकी चालवत नवरदेवाच्या घरी पोहचली. वधूच्या आई वडिलांच्या अनुपस्थितीत हे लग्न पार पडले. या लग्नाला मोजकेच चारपाच लोक उपस्थित होते. हा विवाह दोन एप्रिलला पार पडला.

समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी

यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात राहणाऱ्या सुकेशनी दडांजे या मुलीचा विवाह बाबुळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एका तरुणा सोबत नऊ मार्चला ठरला होता. मुला मुलीकडच्या मंडळींनी जोरदार तयारी केली. लग्नपत्रिका छापल्या मात्र दरम्यान कोरोनाचा विळखा वाढतात चालला असल्याचे लक्षात आल्याने अशा परिस्थितीत कोणाला कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी समंजस भूमिकेतून 9 मार्च या तारखेचा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुढे कोरोना संसर्ग कमी होईल, अशी आशा करून तो विवाह 31 मार्चला करण्याचे ठरवले. मात्र, दुसऱ्या वेळी सुध्दा नियोजित विवाह कोरोनामुळे झाला नाही. त्यामुळे शेवटी नवरदेवाच्या दारातच हा विवाह सोहळा पूर्ण झाला.

Maharashtra Corona | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे, बारा तासात 165 नवे कोरोना रुग्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget