एक्स्प्लोर

आनंदाची बातमी! कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या राज्यात असली तरी रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आतापर्यंत 295 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने तीन हजारचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी आतापर्यंत 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आलेत. तर 2916 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. असे असले तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे.

रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 295 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे. मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले.

आतापर्यंत 295 रुग्ण ठणठणीत

नऊ मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण 14 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर 23 मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 166, ठाणे मनपा 6, ठाणे ग्रामीण 3, कल्याण डोंबिवली 14, मीरा भाईंदर 2, नवी मुंबई 9, पनवेल 3, उल्हासनगर 1, वसई विरार 2, नागपूर 11, पुणे महापालिका परिसर 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे ग्रामीण 4, अहमदनगर ग्रामीण 1, अहमदनगर महापालिका क्षेत्र 2, नाशिक ग्रामीण 1, रत्नागिरी 1, सिंधुदुर्ग 1, सांगली 25, सातारा 1, यवतमाळ 3 आणि गोंदिया 1 असे एकूण 295 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव 

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याची भावना दिसून येत आहे. ठिकठिकाणी या रुग्णांना घरी जाताना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी निरोप देताना दिसत आहेत. कल्याण मधील सहा महिन्यांचा चिमुकल्याला रुग्णालयातून जेव्हा घरी आणले तेव्हा तो राहत असलेल्या संपूर्ण सोसायटीच्या सदस्यांनी गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना बाधीत रुग्ण त्यांचे कुटुंबीय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे.

Solapur Palghar Corona | सोलापूरमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण, पालघरमध्येही आणखी 10 जणांना कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Embed widget