एक्स्प्लोर
लवकरच त्र्यंबकेश्वराचं ऑनलाईन दर्शन
नाशिक : त्र्यंबकेश्वराचं दर्शन लवकरच ऑनलाईन घेता येणार आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक आहे. ऑनलाईन दर्शनाची सुविधा लवकर सुरु केली जाणार असल्याने परदेशातील नागिरकांनाही घरबसल्या दर्शन मिळेल.
शिवप्रसाद निवासी खोल्यांचेही ऑनलाईन बुकिंग करता येईल, त्याचबरोबर देणगीसाठीही ऑनलाईन बँकिंगशी जोडून सुविधा दिली जाईल.
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनसाठी भाविक चार-चार तास रांगेत उभे राहतात. मात्र, गाभाऱ्यात गेल्यानंतर अगदी काही सेकंदच दर्शन घेण्यासाठी मिळतात. त्यामुळे अनेकजण नाराज होतात. हे सारं लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने वेबसाईट अपग्रेड करुन ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुरु करण्याचं ठरवलं आहे.
ऑनलाईन रुम बुकिंग
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्यांना राहण्याची कायमच चिंत असते. मात्र, ही चिंताही मिटणार आहे. कारण शिवप्रसादातील निवासी खोल्यांचेही ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. या खोल्यांचे दर 250 ते 1800 रुपये एवढे आहे.
ऑनलाईन दर्शन
त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सध्या दर्शन पावती 200 रुपयांची आहे. या पावतीद्वारे उत्तर दरवाजातून थेट दर्शन घेता येतं. आता ऑनलाईन दर्शनाच्या सुविधेमुळे आणखी सोपं होईल. मात्र, बुकिंग केल्यानंतर चोवीस तासांच्या आत दर्शन घेणं बंधनकारक असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement