ऑनलाईन वर्गामुळे चिमुकल्यांचं आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटीची लक्षणे
जगभरातील बहुतेक मुले नियमित किंवा अधूनमधून ऑनलाइन वर्गात जवळजवळ 10 महिने शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन वर्गामुळे मुलांमध्ये एकटेपणाचा, रागाच्या भरात आणि उत्तेजित झाल्यासारखे वाटत असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद : दहा देशांमधील बाल मानसशास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार ऑनलाईन वर्गामुळे हयपरअॅक्टिव्हिटीची लक्षणे आणि त्यांचे भावविश्व अडणीत आल्याचं समोर आले आहे. शिवाय पूर्वीच्या तुलनेत साथीच्या आजारात किशोरवयीन मुंलामध्ये चिंता आणि नैराश्याची प्रकरणे जवळजवळ दुप्पट झाली आहेत. 10 देशांमधील बाल मानसशास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार समोर आलं आहे. जगभरातील बहुतेक मुले नियमित किंवा अधूनमधून ऑनलाइन वर्गात जवळजवळ 10 महिने शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन वर्गामुळे मुलांमध्ये एकटेपणाचा, रागाच्या भरात आणि उत्तेजित झाल्यासारखे वाटत असल्याचे समोर आले आहे.
भारत, अमेरिका, कॅनडा, स्पेन, ब्राझील, इंडोनेशिया, स्वीडन, लेबेनॉन, चिली आणि नायजेरिया इटीलाच्या बाल मानसशास्त्रज्ञांचा अभ्यासातून हे समोरं आलं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे बाल मानसशास्त्रज्ञ आणि सहयोगी प्राध्यापक लेन ब्रेटेन, मुंबई येथील बाल मानसशास्त्रज्ञ किरपालानी, स्पेनमधील बाल मानसशास्त्रज्ञ मार्गारेटा चोकन, ब्राझीलमधील बाल व कौटुंबिक मानसशास्त्रज्ञ बार्बरा कॅटरिना यासह अन्य बालमानसशास्त्रज्ञांचा हा अभ्यास आहे.
जगभरातील शिक्षणपद्धती उद्रेकानंतर हायब्रीड मॉडेल आणण्याचा विचार करत असताना मानसशास्त्रज्ञांना असे वाटते की, मुलांचा आणि कुटूंबियांच्या मानसिक आरोग्यावर ऑनलाइन वर्गांचा अल्प आणि दीर्घकालीन परिणाम पाहणे अत्यावश्यक असल्याचं या आभ्यासात म्हटलं. या बाल मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यानुसार पाचपैकी दोन मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटी आणि मुलांच्या भावविश्वाच्या इश्यूची लक्षणे थेट ऑनलाईन वर्गात येण्याशी संबंधित असल्याचे दाखवत आहेत. पूर्वीच्या तुलनेत साथीच्या आजारात किशोरवयीन लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची प्रकरणे जवळजवळ दुप्पट झाली आहेत. बरेच लोक म्हणतात की, ऑनलाईन वर्ग हा मोठा हातभार लावणारा घटक आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे बाल मानसशास्त्रज्ञ आणि सहयोगी प्राध्यापक, लेन ब्रेटेन यांच्या मते, वर्ग 1 ते 3 मधील मूलभूत कौशल्ये शिकत नाहीत. जसे की वाचन शिकणे, मूलभूत गणना करणे किंवा जगातील लहान गोष्टी कशा कार्य करतात हे समजून घेणे. सामाजिक चिंता असलेल्या मुलांसाठी व्हिडिओ कॉलच्या वेळी त्यांच्यावर स्पॉटलाइट असल्याचे आढळून आल्याने ते अधिक आत्म-जागरूक झाले आहेत. काहीजण गृहपाठ करीत नाहीत, तर अनेक किशोरवयीन मुले व्हिडीओ बंद करीत आहेत आणि क्लासमध्ये जाण्याऐवजी इंटरनेट सर्फ करत आहेत आणि गेमिंग किंवा पोर्नोग्राफीची सवय लावत असल्याचं ही या अभ्यासात म्हटलं गेलं.
कोरोना नंतरच्या शिक्षणातील या कठीण काळामध्ये पालकांनी त्यांच्या भावनांबद्दल बोलण्यासाठी मुलांना सामर्थ्य देण्याची आवश्यकता आहे. एकंदरीतपणा एकाकीपणा आणि चिंतातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालक आणि अध्यापनशास्त्र अधिक सहानुभूतीशील आणि सर्जनशील असले पाहिजे असं देखील हा अभ्यास सांगतो.