Chhatrapati Sambhajinagar : क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपीचं पोलिसांना पत्र
छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना सात पानांचं पत्र, उपसंचालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हर्षकुमारचा दावा, तर हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला नवी मुंबईतून अटक.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना सात पानांचे पत्र पाठवून बैंक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा केला.
उपसंचालकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या कडून हे सगळं करून घेतलं, सगळी संपत्ती मी संजय सबनीस यांच्या धमकीमुळे माझ्या नावावर घेतली ही संपत्ती विकून सगळे पैसे वसूल करावे आणि सबनीस याना अटक करावी अशी मागणी हर्षकुमार याने केली आहे...
हे पत्र त्यांनी पोस्टाद्वारे पोलिसांना पाठवल आहे..