Medha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग
पुण्यात भिंतीला हिरवा रंग देऊन हार, फूल चढवण्याचा प्रकार, व्हायरल व्हिडीओनंतर खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग. सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील प्रकार
काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली.
पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया.
माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया . आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा