एक्स्प्लोर
अमरावतीत मुनगंटीवारांच्या गाडीवर कांदे फेकले
अमरावती : आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट मंत्र्यांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. अमरवातीच्या गुरुकुल मोझरीमधल्या शेतकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीसमोर कांदे आणि दूध फेकून संताप व्यक्त केला.
यावेळी काही शेतकरी थेट मुनगंटीवारांच्या गाडीवरही चढले. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. दरम्यान शेतकऱ्यांच्या या कृतीविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं.
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू समितीतील सदस्य आणि कम्युनिस्ट नेते अजित नवले यांनी दिला.
कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील नाशिकमध्ये दाखल झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement