एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त
अहमदनगर : नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा जप्त केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अहमदनगरमध्येही एका कांदा व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. व्यापारी संजय शेलारला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. शेलार नगर शहरातील सावेडीत संत नामदेव नगरमध्ये राहतात.
शेलारकडे जुन्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी रविवारी शेलारच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी एका बॅगेत पाचशे आणि हजाराच्या 98 लाख 98 हजारांच्या जुन्या नोटा आढळल्या.
त्यामध्ये हजाराच्या साठ लाख 26 हजार, पाचशेच्या 39 लाख 72 हजार नोटा सापडल्या. ही रक्कम मोजण्यास तब्बल चार तास लागले. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement