सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त, तिघांना अटक
नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या तब्बल एक कोटींच्या जुन्या नोटा इस्लामपूरमध्ये सापडल्या आहेत. शहरातील एसटी स्टँडजवळ छापा टाकत इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
सांगली : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, या सर्व 500 रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. नोटा बदल्याण्यासाठी आले असता इस्लामपूर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या तब्बल एक कोटींच्या जुन्या नोटा इस्लामपूरमध्ये सापडल्या आहेत. शहरातील एसटी स्टँडजवळ छापा टाकत इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली. नोटा घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तिन्ही आरोपी वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील आहेत. इस्लामपूर पोलिसांना सूत्रांकडून इस्लामपूरमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी सापळा रचत तीन आरोपींकडून 99 लाख 97 हजार रुपयांच्या 500 च्या जुन्या नोटा जप्त केल्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा कुठून आणल्या? कुणाला दिल्या जाणार होत्या? याबाबत इस्लामपूर पोलीस तपास करत आहेत.