(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुमित वाघमारे हत्या प्रकरणी एकाला अटक
प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. सुमितने दोन महिन्यापूर्वी वर्गामैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह केला होता.
बीड : बीड सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कृष्णा क्षीरसागर या आरोपीस अटक केली आहे.
घटनेला तब्बल पाच दिवस झाल्यानंतर पोलिसांना एका आरोपीस अटक करण्यात यश आलं आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे अद्याप फरार आहेत.
प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. सुमितने दोन महिन्यापूर्वी वर्गामैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह केला होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमित राहत असलेल्या सुमितचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत प्रेम जुळले होते. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं.
मात्र दोघांनी सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याची हत्या केली. तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली आहे. सुमितवर हल्ला करणारे आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसाकंडून त्यांचा शोध सुरू आहे.
संबंधित बातम्या