एक्स्प्लोर

21 October In History : अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म , सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना; आज इतिहासात

On This Day In History : आजचा दिवस हा राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई : 21 ऑक्टोबर हा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्याच दिवशी 1943 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 21 ऑक्टोबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला होता. अल्लाउद्दिन खिलजीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली होती. Hit And Run प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा केली. त्याशिवाय आज अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यातिथी आहे. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1833: अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म

स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल  यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला होता.  अल्फ्रेड नोबल यांनी डायनामायटचा शोध लावला होता. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पारितोषिक (nobel prize) हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या कमाईचा बहुतांश भाग हा नोबेल पुरस्काराच्या फंडसाठी दिला होता. तर पहिल्यांदा नोबेल पुरस्कार हा 1901 मध्ये देण्यात आला होता. दरम्यान 1968 मध्ये सेंट्रल बँक ऑफ स्वीडनने इकॉनॉमिक सायन्सेस हा आणखी एक वर्ग या पुरस्कारांसाठी जोडला. तर जगातला हा सर्वात श्रेष्ठ दर्जाचा पुरस्कार असल्याचं म्हटलं जातं. 

1931 : शम्मी कपूर यांचा जन्म

प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. 50 आणि 60 च्या दशकात शम्मी कपूर यांनी अनेक यशस्वी चत्रपट दिले. शम्मी कपूर यांचे नाव भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणलं जातं. शम्मी यांनी  अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात  गंभीर भूमिकांपासूनच केली, पण फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन - दिग्दर्शित तुमसा नही देखा (इ.स. 1957 अमितासोबत) आणि दिल देके देखो (इ.स. 1959 आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर त्यांची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली.शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. तीसरी मंजिल (इ.स. 1966) हा विजय आनंददिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.

1943: सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी ‘आझाद हिंद’ सरकारची स्थापना केली. बोस यांनी दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरमध्ये हे सरकार स्थापन केले. नेताजींनी या सरकारला स्वतंत्र भारताचे पहिले 'आरजी हुकुमते-आझाद हिंद' म्हटले जाते. भारताला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अक्ष शक्तींशी युती करण्याच्या उद्देशाने 1940 च्या दशकात भारताबाहेर सुरू झालेल्या राजकीय चळवळीचा हा एक भाग होता. शाही जपानच्या आर्थिक, लष्करी आणि राजकीय सहाय्याने सिंगापूरमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात याची स्थापना करण्यात आली. . ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही.[१४][१५] ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या 300 अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला होता. पण सुभाषचंद्र बोस यांच्या निधानानंतर संपूर्ण आझाद हिंद चळवळीचा अंत झाल्याचं म्हटलं जातं. 

2012: यश चोप्रा यांचे निधन

चित्रपट निर्मिती कंपनी यशराज फिल्म्सचे संस्थापक आणि चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचे 21 ऑक्टोबर 2012 साली निधन झाले.  27 सप्टेंबर 1932 रोजी तत्कालीन पंजाब प्रातातील लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना सहा राष्ट्रीय चित्रपट आणि 8 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले . भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आणि 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.  2006 मध्ये, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सने त्यांना आजीवन सदस्यत्व दिले. तसेच हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी 1959 मध्ये धूल का फूल , अवैधतेबद्दल एक मेलोड्रामा, आणि धर्मपुत्र (1961) या सामाजिक नाटकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं.  

2018 : राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन 

देशभरात आज राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लदाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून दरवर्षी 21 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पोलिस दिन किंवा पोलिस स्मृती दिन साजरा केला जातो.


आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना -

1296 : अल्लाउद्दिन खिलजीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली.  
1917: मराठी संगीतकार आणि गायक राम फाटक यांचा
1934 : जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. 
1950 : चीनने हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेटवर कब्जा केला. 
1951 : शामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. 
1970 :  नारमन इ बारलॉग यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.
1999 : बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 
1949 : इस्राईलचे नववे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा जन्म
2002 : Hit And Run प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खान विरोधात गुन्हा दाखल केला. 
2003 : चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्र नौदल सराव केला. 
2012 : सायना नेहवालने डेनमार्क ओपन बॅडमिंटन सुपर सीरीज खिताप पटकावला. 
 2013 : कॅनाडा सरकारने मलाला युसफजई यांना नागरिकत्व दिलं. 
2014 : प्रसिद्ध पॅरालम्पिक धावपट्टू आस्कर पिस्टोरियोस याला हत्याच्या गुन्ह्यामध्ये पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget