Omicron : 'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोनाबाधित
देशात लखनौ वगळता विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ‘जोखीम’असलेल्या देशांमधून मध्यरात्रीपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण 11 आंतरराष्ट्रीय विमाने उतरली.
मुंबई : देशात आज परदेशातून आलेल्या 3476 आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी सहा कोरोनाबाधित आढळले आहे. कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांचे अहवाल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. विशेष म्हजे हे सर्व प्रवासी 'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेले आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण समोर आले आहे त्यांना रिस्क कॅटेगरीमध्ये टाकले आहे.
देशात लखनौ वगळता विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ‘जोखीम’असलेल्या देशांमधून मध्यरात्रीपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण 11 आंतरराष्ट्रीय विमाने उतरली. यामधून 3476 प्रवासी भारतात उतरले. या सर्व 3476 प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ 6 प्रवासी कोविड-19 बाधित आढळले.
या कोविड-19 बाधित प्रवाशांचे नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी INSACOG प्रयोगशाळेत पाठवले आहे. या सर्व परिस्थितीवर भारत सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि संपूर्ण सरकार या दृष्टीकोनातून महामारीचा सामना करण्यासाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यांना पाठबळ देत आहे.
जवळपास 14 देशांमध्ये ओमिक्रॉनचा व्हेरियंट
दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक वेगानं होत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील जवळपास 14 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी जगानं कोरोनाच्या डेल्टा व्हायरसची भीषणता अनुभवली आहे. अशातच अनेक देशांनी आधीच सतर्क होत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच या अनुषंगानं काही निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये 24 नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन आढळून आल्याची माहिती डब्ल्यूएचओच्या वतीनं देण्यात आली होती.
ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक, तज्ज्ञांचा दावा
एएनआयच्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.'
Kalicharan Maharaj on Omicron : कोरोना आणि WHO एक फर्जीवाडा आहे, झाल्यास मोठ्या रुग्णालयात जाऊ नका
संबंधित बातम्या :