Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 207 नव्या रुग्णांची नोंद
Omicron in Maharashtra : राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 1216 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 454 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
![Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 207 नव्या रुग्णांची नोंद Omicron in Maharashtra Record new 207 omicron patients in the state in a single day Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 207 नव्या रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/a566bf379a041f826cd268bdb71536b2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 207 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या एक हजारापेक्षा अधिक आहे.
राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 57 रुग्ण हे सांगलीतील आहेत. त्यानंतर मुंबईत 40, पुणे महानगरपालिका 22, नागपूर 21, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 15, ठाणे महानगरपालिका- 12, कोल्हापूर- 8, अमरावती- 6, उस्मानाबाद-5, बुलढाणा आणि अकोला प्रत्येकी तीन, गोंदियात तीन, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोलीतील प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, लातूर, जालना आणि मीरा भाईंदर प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 1216 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 454 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 26 रुग्ण हे राज्यातील नागरिक आहेत तर 9 रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 72 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देताय? मग आधी या गोष्टी तपासा; BMCकडून टोल फ्री नंबरही जारी
- मुंबई महानगरात प्रत्येक महापालिकेची वेगळी नियमावली, नागरिक संभ्रमात
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)