एक्स्प्लोर
नाशिक प्रेसमध्ये 50,100 च्या 35 लाख नोटांची छपाई
![नाशिक प्रेसमध्ये 50,100 च्या 35 लाख नोटांची छपाई Notes Of 100 50 20 Being Printed In Nashik Press नाशिक प्रेसमध्ये 50,100 च्या 35 लाख नोटांची छपाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/09150804/Nashik_Press_Note.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. नोटा बदलाच्या निर्णयानंतर राज्यात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्यात.
सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटेसोबतच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई सुरु आहे. आठवडाभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे.
कालच या नोट प्रेसमधून 50 कोटीच्या 500 च्या नोटांचा पुरवठा केल्यानंतर, आता 50 आणि 100 च्या सुमारे 35 लाख नोटा छापून तयार झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच नोटांचा तुटवडा दूर होणार आहे.
दरम्यान, या कामासाठी सिक्युरिटी प्रेसमधील कामगारही मोठी मेहनत घेत आहेत. याची दखल घेत सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
नोटांबाबतचे निर्णय शिथील
नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आलेत. त्यामुळे आता बँकेतून दिवसाला 4 हजारांऐवजी साडे चार हजार रुपयांच्या नोटा तुम्हाला बदलून घेता येणार आहेत.. तर एटीएममधून 2 हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे. या शिवाय इतर बँक व्यवहारांवर लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
सरकारी दवाखाने, खासगी मेडिकल, पेट्रोलपंप, दूधकेंद्र आणि टोलनाक्यांवर जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा घेण्याची मुदत केंद्र सरकारने 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरा घेतलेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चलन तुटवड्यामुळे सध्या देशभरात नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या हाती नव्या नोटा आल्या नाहीत, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. याचे पडसाद उमटतानाही दिसतायेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक बोलावली होती. यावेळी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)