राजेश टोपेंनी पुन्हा छातीठोकपणे सांगितलं, 'महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही!'
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरु केली आहे. दरम्यान राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याचं राजेश टोपेंनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.
![राजेश टोपेंनी पुन्हा छातीठोकपणे सांगितलं, 'महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही!' Not Single death due to Oxygen Scarcity says Maharashtra health Minister Rajesh Tope राजेश टोपेंनी पुन्हा छातीठोकपणे सांगितलं, 'महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही!'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/05/e24810e70b8c7c6ce31515a86ae79a24_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कोरोनामृतांची आकडेवारी लपवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य करताना आकडेवारीची नोंद होताना पुढे मागे होत असेल असं म्हणाले आहेत. शिवाय राज्यात ऑक्सिजनअभावी एकही कोरोनामृत्यू न झाल्याचं टोपे यांनी पुन्हा एकदा छातीठोकपणे सांगितलं आहे.
तसंच कोरोना काळातील मृ्त्यू राज्य सरकारने लपवल्याचे आरोप झाले असले तरी हायकोर्टाने आम्ही चांगलं काम केल्याचं नमूद केलं आहे, असं प्रतिपादन टोपेंनी केलं. शिवाय WHO ने देखील मुंबईच्या धारावीतील कामगिरीचं कौतक केल्याबद्दलही टोपे म्हणाले. दरम्यान 1 लाख 40 हजार मृत्यू झाले असले तरी 12 कोटी लोकांना तपासल्याचं तसंच लॅबची संख्या वाढवल्याचं कामही राज्य सरकारने केल्याचं टोपे म्हणाले.
ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही
कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू न झाल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. तसंच स्वत: पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एकूण बेडपैकी 25 टक्के बेड महाराष्ट्र राज्यात असल्याचा उल्लेख केल्याचंही टोपे म्हणाले. तसंच फडणवीसांच्या आरोपांबाबत बोलताना टोपे म्हणाले, "एप्रिल आणि मे मधील जी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे आकडे जरी खरे असले तरी ती नोंद लगेच झालेली असेलच असे नाही. कदाचित ती मागे पुढे होत असल्याने अशाप्रकारची आकडेवारी समोर येत असेल. तसंच या साऱ्याबाबत मी स्वतः विरोधी पक्ष नेते यांच्या सोबत मी चर्चा करायला तयार आहे. त्यांनी जो आरोप केला कोरोना मृत्यु लपवण्याचा तर तो त्यांनी मागे घ्यावा''
संबंधित बातम्या :
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Corona in Mumbai : मुंबईकरांनो अधिक काळजी घेण्याची वेळ आली, कोरोना रुग्णवाढीचा दर वाढतोय
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)