एक्स्प्लोर

या गावात गेल्या 40 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक होत नाही!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगावात गेल्या चाळीस वर्षात एकदाही निवडणूक झाली नाही.

सोलापूर : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या गरमा गरम चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापूरातलं एक गाव असं आहे, जिथे 1979 सालापासून निवडणूकच झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव... गेल्या 40 वर्षात एकदाही गावात निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार गावातले जेष्ठ मंडळी ठरवतात. प्रत्येक प्रभागाचा मतदारसंघाच्या आरक्षण रचनेप्रमाणे उमेदवार निश्चित होतो. ना कसली स्पर्धा..ना कुठले वाद.. या गावात 1979 सालापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीचा खर्च वाचवून बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यावर विकासकामाचं दडपण ठेवण्याची मळेगावची प्रथा आहे. गेल्या तीस वर्षात पोलीस ठाण्यात एकही तक्रार नाही मळेगावात निवडणुका होत नसल्याने पोलीस ठाण्यात गेल्या तीन दशकात एकही तक्रार दाखल झाली नाही. गावातली भांडण मिटवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. जी सगळ्यांना बंधनकारक असते. एखाद्या न्यायव्यवस्थेसारखं गावातल्या तंटामुक्ती समितीचं कामकाजाच स्वरूप आहे. बिनविरोध निवडणुकीची प्रथा निवडणुका या अशांततेला कारणीभूत ठरत असल्याने या गावात आजपर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. निवडणुका जाहीर झाल्या की गावकऱ्यांची बैठक होते. प्रत्येक प्रभागातला एक उमेदवार सर्वानुमते ठरवला जातो. तोच उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतो. विरोधात कुठलाही उमेदवारी अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवसच विजयाच्या मिरवणुकीने समाप्त होतो. निवडणुका म्हटलं की, लाखोंचा खर्च आणि भांडण-तंटे, आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणि एकमेकांवर चिखलफेक ही आलीच. त्यातूनच गावातला संघर्ष आणि वाद निर्माण होतात. रक्ताच्या नात्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवलेली उदाहरणं गावोगावी पाहायला मिळतात. मळेगाव मात्र त्याला अपवाद आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून या गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. त्यामुळे गाव सुखी आणि शांत आहे.

संबंधित बातमी : साडे सात हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget