Nitin Raut : वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, दहावी-बारावीची परीक्षा लक्षात असू द्या, उर्जामंत्र्यांचे संपकऱ्यांना आवाहन
संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं उर्जामंत्री राऊत (Nitin Raut) म्हणाले
Nitin Raut : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे.
खासगीकरणाचा सरकारचा विचार नाही
खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. दरम्यान खासगीकरण कोणत्याही कंपनीचं होणार नाही, तसेच सरकारचा तसा अजिबात विचारही नाही अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. महावितरण आर्थिक संकटात असून कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा होऊन संप मागे घेतला जाईल. एक पाऊल सरकार मागे येईल, एक पाऊल कर्मचाऱ्यांनी मागे यावं, असं सांगत याविषयी तोडगा काढण्यासाठी उद्या संघटनांची बैठक देखील बोलावली आहे असे उर्जामंत्री म्हणाले. जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभागी झाले. त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली. वीज कर्मचारी यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये. सध्या उष्णता वाढली आहे, विजेची मागणी ही वाढलेली आहे, दहावी-बारावीची परीक्षाही सुरू आहे, शेतामध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्यावा अशी विनंती केली. उद्या समोरासमोर बसून मुंबईत चर्चा करू असंही त्यांना सांगितले आहे.
संप कायम राहिल्यास वीज निर्मितीवर परिणाम
राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे. दरम्यान उद्या सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल. आणि भारनियमानं सारखी परिस्थिती राज्यावर येऊ देणार नाही असे आश्वासन वीज संघटनांनी दिले, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या प्रधान सचिवांनी ही वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना सोबत चर्चा केली होती काही प्रमाणात गैरसमज आहे, मात्र उद्या चर्चेतून सर्वदूर होईल. असे राऊत म्हणाले
ग्राहकांनी विजेचा वापर करताना बिल भरणे ही आवश्यक
वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे. ही बाब सत्य आहे. अधिकारी सध्या कोळशा कंपनीच्या पिट्स वर बसून असून निघणारा कोळसा लगेच वीज प्रकल्पामध्ये पाठवत आहेत. तरीपण अनेक प्रकल्पांमध्ये दीड आणि दोन दिवसांचा साठा आहे. मात्र हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यात आहे. महावितरण सेवा करणारी कंपनी आहे. मात्र, ग्राहकांनी विजेचा वापर करताना बिल भरणे ही आवश्यक आहे. हे ग्राहकांचाही कर्तव्य होतं. ग्राहकांनी वीज बिल भरलं तर महावितरण वर आर्थिक संकट ओढवणार नाही. आम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास आहे.
दोन अडीच दिवसांचाच कोळशाचा साठा
आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. घोषणेप्रमाणे हा संप सुरु देखील झाला आहे. यात प्रामुख्यानं विद्युत, बँकिंगसह अनेक केंद्रीय कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर होत आहे. यामध्ये कोळसा पुरवणारे कामगार संपावर असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी अंधार होण्याची शक्यता आहे. आज अनेक युनियन संपावर आहेत आणि त्यातच राज्यातील अनेक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड्सचे युनियनही सामील आहे. यात खदानीमध्ये काम करणाऱ्यांपासून इतर अनेक हे दोन दिवस संपावर असणार आहेत आणि त्यामुळेच राज्यात अनेक ऊर्जा निर्मिती केंद्रांवर जिथे दोन अडीच दिवसांचाच कोळशाचा साठा आहे. तिथे वीज निर्मितीची परिस्थिती ही अटीतटीची होऊ शकते.
विद्युत केंद्र स्टॉकचे दिवस
खापरखेडा 10
चंद्रपूर 8
पारस 2.5
परळी 2.7
भुसावळ 2
नाशिक 2
कोराडी 2
महत्त्वाच्या इतर बातम्या
- राज्य सरकारकडून वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा, संपावर जाण्यास मनाई
-
Bharat Bandh : संपाचा 'शॉक' लागणार; कोळसा नाही पोहोचला तर राज्यात अनेक ठिकाणी अंधार!
- West Bengal Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात 21 आरोपी असल्याची सीबीआयची माहिती, 10 जणांचा झाला होता जळून मृत्यू
- महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची माहिती