Nitin Gadkari : देशात ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रक लॉन्च करणार : नितीन गडकरी
सार्वजनिक वाहतूक (Public Transport) वाढवायला हवी, त्याला प्रयोरिटी देणं गरजेचं असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं.
Nitin Gadkari : सार्वजनिक वाहतूक (Public Transport) वाढवायला हवी, त्याला प्रयोरिटी देणं गरजेचं आहे. जर सगळ्या गोष्टी लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टनं दिल्या तर त्याचा वापर होईल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. देशात ई-हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे गडकरी म्हणाले. रिसर्च करा मी त्याला इन्करेज करतो असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुढच्या महिन्यात ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. तसेच मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचे गडकरी म्हणाले. मुंबई आयआयटीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्वान बनणं आणि चांगला व्यक्ती बनणं हे खूप वेगळं आहे. नॉलेजसोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. एनर्जी क्रायसेस सगळ्यात मोठी समस्या असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलायची संधी मिळाली त्यावेवी मी त्यांना विचारला की तुमच्या काय समस्या आहेत, ते म्हणाले समाजव्यवस्था बिघडली आहे, कुटुंबपद्धतीत लिव्ह इन रिलेशनशिप पद्धत वाढल्याचं त्यांनी सांगितल्याचे गडकरी म्हणाले.
मुंबईत हवेमध्ये चालणारी डबल डेकर बस हवी
मुंबई आयआयटीच्या आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये वेगळा फरक आहे. तुम्ही रिसर्चवर भर देता असेही गडकरी म्हणाले. सोशल इकॉनॉमिक सिनरिओ तुम्ही चेंज करु शकता, त्या प्रकारचा सिर्सच इनोव्हेशन तुम्ही करु शकता असेही ते म्हणाले. आयआयटीसमोर मेट्रोचं काम सुरु आहे. मेट्रो, ब्रिजमधील दोन पिलरमध्ये आपल्याकडे 30 मीटर अंतर आहे, तर मलेशियामध्ये 102 मीटर आहे. फायबर स्टीलचा वापर तिथे केला जातो. ज्यामुळं कॉस्ट कमी होते. हा तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे असेही ते म्हणाले. हवेमध्ये चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवी आहे. त्यामुळं वेळ वाचेल आणि ट्राफिकही कमी होईल असे गडकरी म्हणाले. मी माझ्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी जिंकलो, पुढच्या वेळेस पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीत ज्यांना मी मोठं समजायचो ते मोठे नव्हते
मला दिल्लीत जेव्हा संधी मिळाली तेव्हा अनेकांना भेटलो. मी एकाला दिल्लीत म्हणालो की दिल्लीचं पाणी चांगलं नाही, महाराष्ट्र खूप चांगला आहे. दिल्लीत खूप हुशारीने काम करावं लागतं. दिल्लीत ज्यांना मी मोठं समजायचो ते मोठे नव्हते आणि ज्यांना मी छोटा समजायचो ते खूप मोठे निघाल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. आपल्याकडे सकारात्मकता हवी, निर्णय घेण्याची क्षमता हवी पारदर्शकता हवी असेही गडकरी यावेली म्हणाले. अहंकारामुळं अनेकदा मॅनेजमेंट लेव्हलला अडचणी निर्माण होतात. संबंध कसे असावे हा सगळीकडेच महत्वचा विषय असल्याचे गडकरी म्हणाले. आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल असेही गडकरी म्हणाले. मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचेही गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: