एक्स्प्लोर

नववी ते बारावीच्या विषयरचना-मूल्यमापन पद्धतीच्या पुनर्विचारासाठी समिती

निकाल कमी लागल्यानंतर यावर फेरविचार होऊन पुन्हा एकदा अंतर्गत मूल्यामापनाबद्दलच्या निर्णयात बदल होऊ शकतो. हा अहवाल दहा दिवसात सादर करायचा आहे.

मुंबई : 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना आणि मूल्यमापन पद्धती यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी दिली. गठीत करण्यात आलेली समिती सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाची विषय योजना, मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करुन दहा दिवसात अहवाल सादर करणार आहे. 2019 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्यात आला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कमी लागला. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन आणि विषय रचना याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याने शिक्षण विभागाकडून शिक्षण समितीचा गठीत करण्यात आली आहे. निकाल कमी लागल्यानंतर यावर फेरविचार होऊन पुन्हा एकदा अंतर्गत मूल्यामापनाबद्दलच्या निर्णयात बदल होऊ शकतो. हा अहवाल दहा दिवसात सादर करायचा आहे. कारण सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये पॅटर्नबद्दल अजूनही संभ्रम आहे. शिक्षण आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. विद्या प्राधिकरणाचे संचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष या समितीचे सदस्य असतील. याशिवाय डॉ. विष्णू वझे, किशोर चव्हाण, मनिषा महात्मे, रमेश देशपांडे, डॉ. अरुणा सावंत, एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. ज्योती गायकवाड, पी.एल.पवार, सुचेता नलावडे, हिना समानी हे उच्च माध्यमिकसाठी सदस्य म्हणून काम करणार आहेत. वैशाली पोतदार, अपर्णा कुलकर्णी, हेमंत पुजारी, जयश्री काटीकर, तिलोत्तमा रेडडी, मोहन शेटे,नागेश माने, गिता बोधनकर, ॲना कोरिया, अंकुश महाडीक, विकास गरड हे सदस्य माध्यमिकसाठी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात
Prakash Mahajan Resignation: मनसेला अचानक 'जय महाराष्ट्र' का केला? प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन भाऊ...
मनसेला अचानक 'जय महाराष्ट्र' का केला? प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन भाऊ आम्हालाच...
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात
Prakash Mahajan Resignation: मनसेला अचानक 'जय महाराष्ट्र' का केला? प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन भाऊ...
मनसेला अचानक 'जय महाराष्ट्र' का केला? प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन भाऊ आम्हालाच...
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
Embed widget