New Species Of Tortoise: कोकणातील वायंगणी समुद्र किनाऱ्यावर आढळली कासवाची नवी प्रजाती
New Species Of Tortoise At Sindhudurg : वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर कासवाची नवी प्रजाती आढळून आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिक संशोधन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
New Species Of Tortoise At Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागातल्या सध्या मोठ्या प्रमाणात कासवांचं संवर्धन केले जात आहे. वेंगुर्ले तालुक्यातल्या वायंगणीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सागरी कासवांचे संवर्धन सुरू आहे. या भागात कासवांच्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लॉंग लेदर, होक्स बिल प्रजाती आढळतात. मात्र प्रथमच वायंगणी समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही प्रजातींचे एकत्र जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली आहे. कासवांच्या या नव्या प्रजातीचे जनुकीय विश्लेषण केले तर नवी प्रजाती समोर येईल असं कासव अभ्यासकांचं मत आहे.
ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही जातींच्या कासवांच्या संकरातून ही नवी प्रजाती जन्माला आली असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. जनुकीय विश्लेषण झालं तर कासव संशोधन आणि संवर्धनात महत्त्वाची भर पडेल. तसेच ही अनोखी प्रजाती या भागात सापडल्यामुळे तिला या गावाचं म्हणजे वायंगणी गावाचं नाव द्यावं अशी तज्ज्ञ, कासव मित्र आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
वायंगणी येथे सुहास तोरसकर या कासव मित्राला मिळालेली कासवाची पिल्ले आढळून आली. ही कदाचित संकरित झाली आहेत असे तोरसकर यांनी म्हटले. ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्हींचे गुणधर्म त्याच्यामध्ये दिसून येतात. ग्रीन टर्टल कासव असते तर त्याचे मागचे पुढचे पाय, पोटाकडचा संपूर्ण भाग तसेच मान आणि डोळे पांढरे दिसले असते. पण तसं न दिसता या पिल्लामध्ये फक्त पुढच्या पायाच्या कडा आणि पोटाकडचा थोडासा भाग आणि कडा एवढा भाग पांढरा असल्याचे दिसून येते. उर्वरीत शरीर हे काळसर राखाडी रंग असलेल्या ऑलिव्ह रिडले सारखे दिसते. त्यामुळे त्याचे जनुकीय विश्लेषण झालं तर याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते. त्यानंतर हे ग्रीन टर्टल आहे की ऑलिव्ह रिडले यांच्यामध्ये संकरीत झालेला कासव आहे.
गेली अनेक वर्ष वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्र किनाऱ्यावर अथक प्रयत्न करून वीस पंचवीस वर्षांपूर्वी पासून कासव संवर्धनाचे काम करत आहोत. मात्र आता नवीन प्रकारचा एक कासवाची पिल्ले दिसून आली असल्याचे कासव मित्र सुहास तोरसकर यांनी म्हटले. ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या दोघांचे गुणधर्म असलेला नवीन प्रकारचा कासव आहे. याचं आम्हाला कुतूहल असून ही कोणती नवीन प्रजाती आहे. याचं संशोधन होऊन त्याला वायंगणी गावाचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केली. तसेच गावात कासवांचं संग्रहालय व्हावे, कासव संवर्धन केंद्र करावं आदी मागणीही त्यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ऐकावं ते नवलंच! जमिनीचा अधिक मोबदला मिळण्यासाठी रात्रीतून उभारली आमराई! महामार्गाची दिशा बदलल्याचाही आरोप
- Jharkhand News : झारखंडमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, अनेक पर्यटक अडकले