एक्स्प्लोर

Jharkhand News : झारखंडमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, अनेक पर्यटक अडकले

Jharkhand News : झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. तर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

Jharkhand News : झारखंडच्या देवघरमध्ये (Deoghar) रोपवेच्या (Ropeway)  दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. काल दुपारची ही घटना असून अजूनही 48 जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सध्या एनडीआरएफ (NDRF) आणि आयटीबीपीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.  

झारखंड (Jharkhand) च्या देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेचा भीषण अपघात झाला. अजूनही अनेक पर्यटक रोपवेमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप परत आणलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

NDRF कडून बचाव कार्य सुरु 

भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर आज सकाळी साडेसहा वाजता त्रिकुटी पर्वतावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासह ITBP, भारतीय सेना आणि NDRF ची टीम त्रिकूट पर्वतावर पोहोचली आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून ट्रॉलीतून सुखरूप खाली आणलं जाणार आहे.  

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप 48 प्रवासी विविध ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून एकूण 8 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. त्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना संयम राखण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे.

झारखंडमधील देवघरमध्ये एक अपघात झाला आहे. येथील त्रिकूटी डोंगरावरील रोपवेमध्ये बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली. एकूण 48 लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सुमारे 20 तास पर्यटक रोपवेमध्ये अडकून पडले आहेत. अडकलेले पर्यटक हे बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी अपघात, मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. रविवारी संध्याकाळपासून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफ आणि लष्कराचं पथकाकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rasgulla Choking Death : रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वास गुदमरून एकाचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला
रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वासही घेता येईना; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला, झारखंडच्या जमशेदपुरमधली धक्कादायक घटना
LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
LPG Gas Shortage Maharashtra: गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; छगन भुजबळांची घोषणा
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Embed widget