एक्स्प्लोर

अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

पुणे :  गेले अनेक दिवस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्य शासनकडून जीआर काढून नियुक्ती झाली असल्याबाबतची अधिकृतपणे घोषणा केली आहे. गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकांना लक्षात घेता ही जागा लवकरच भरणार अशी चर्चा होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या. रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सक्रिय आहेत सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात. 

अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. 

दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. 

नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म

व्हिडीओ

Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
Embed widget