(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द : रुपाली चाकणकर
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहे. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी जरा आत्मचिंतन करावे, असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला.
मुंबई : राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यश्र चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काल केला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी 'चंद्रकांत दादा आपल जितक वय आहे तितक आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे', असे म्हणत पलटवार केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांचं वय झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते की .राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? यावर चाकणकर उत्तर दिले आहे. राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावा" असा टोला चाकणकर यांनी लगावला.
राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्राकडून सुरू
चाकणकर म्हणाल्या, गेल्या दीड वर्षापासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची निवड रखडली आहे. ही नियुक्ती का रखडली आहे हे महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारात काही नावं राज्यपालांना देतात. राजकीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ही नावं मान्य करतात. पण राज्यात आपली सत्ता नाही म्हणून राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्राकडून सुरू आहे.
चंद्रकांत दादा आपल जितक वय आहे तितक आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे...(1/2)@ChDadaPatil pic.twitter.com/ZBXO0TtBcY
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 17, 2021">
चंद्रकांत पाटील यांनी आत्मचिंतन करावे
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहे. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी जरा आत्मचिंतन करावे. कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं भान येईल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
शरद पवारांच्या वक्तव्यावर राज्यपालांची प्रतिक्रिया
शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय टीका करणार. ते आपल्या देशाचे माननीय व्यक्ती आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायला हवी का? असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते शरद पवार?
राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांचं वय झाला आहे.त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही,अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? त्यामुळे कुणी कुणाचं वय काढू नये, आमदारांच्या विषयावर कोर्टाने देखील सांगितलं आहे की तो राज्यपालांचा अधिकार आहे.
संबंधित बातम्या :
शरद पवार सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ भाजप पोलखोल सभा घेणार : चंद्रकांत पाटील