एक्स्प्लोर

आमदार अमोल मिटकरींची 'कुणी बेड देता का, बेड' म्हणत वणवण; अकोला ते नागपूर हेलपाटे मारुनही हाती अपयश

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मित्राच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासाठी बेड मिळावी यासाठी त्यांनी अकोला ते नागपूर प्रयत्न केले. मात्र एवढं करुनही त्यांंना बेड उपलब्ध झाला नाही.

अकोला : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रकोपानं महाराष्ट्र अक्षरशः सैरभैर झाला आहे. राज्यातील रूग्णांचं प्रमाण दररोज हजारोंच्या संख्येत वाढत आहे. या संकटात राज्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून गेल्याचं चित्रं अगदी दररोज पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी 'बेड' न मिळाल्यानं, व्हेंटिलेटर नसल्यानं अन ऑक्सिजन न मिळाल्यानं शेकडो रूग्णांना जीवाला मुकावं लागलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सरकारनं खाजगी दवाखान्यांना 'कोविड रूग्णालय' म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, आता सरकारी दवाखान्यांबरोबरच खाजगी दवाखान्यातही कोरोना रूग्णांचे 'बेड' अगदी 'फुल' झाले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये 'वेटिग लिस्ट' ही शेकडोंच्या घरात आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये अनेक बेड पैशावाल्यांनी अडवून ठेवल्याचं विधान अलिकडेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. राज्यातील सध्याच्या 'बेड' अनागोंदीचा अनुभव आणि फटका राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना बसलाय.

आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात एक संतप्त आणि भावनिक 'पोस्ट' आपल्या फेसबुक 'पेज'वर 'शेयर' केली आहे. ही घटना 13 सप्टेंबरची आहे. त्यांच्या अकोल्यातील एका मित्राच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. मित्राच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं त्यांनी कोविडवर उपचार करणाऱ्या दोन प्रमुख खाजगी रुग्णालयात 'बेड'साठी प्रयत्न केले. मात्र, तेथे 'बेड' उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागपुरातील एका खाजगी रुग्णालयाच्या सांगण्यावरून रूग्णाला नागपूरला हलवण्यात आलं. मात्र, नागपूरला रूग्ण पोहोचल्यानंतर 'त्या' रूग्णालयानं चक्क घुमजाव करीत 'बेड' नसल्याचं सांगितलं. अखेर त्या वृद्ध रूग्णाला शेवटी सरकारी दवाखान्यातच भरती करावे लागले.

हा संपूर्ण घटनाक्रम आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय उद्विग्नपणे मांडला. खाजगी दवाखाने एका आमदाराला अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल आमदार मिटकरींनी केला आहे. खाजगी दवाखान्यांच्या मुजोरीचा फटका श्रीमंत रूग्णांना बसत असेल तर गरिबांचं कसं होत असेल? असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. आमदार अमोल मिटकरींची पोस्ट आपलच सरकार आणि व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

कोण आहेत अमोल मिटकरी?

अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. चार महिन्यांपूर्वी विधानसभेतून निवडून द्यायच्या जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. अजितदादांच्या पुढाकारानेच अमोल मिटकरींना आमदारकी मिळाली. ते पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत.

आमदार अमोल मिटकरी यांची पोस्ट

'मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र'...

"माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना 'आयसीयू'मध्ये अॅडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये 'आयकॉन' आणि 'ओझोन' असे दोन हॉस्पिटल आहेत. मात्र, तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

सर्वानुमते निर्णय घेऊन एका खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून आम्ही पेशंटला नागपूरमध्ये 'वोकार्ट' हॉस्पिटलला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर) त्यांच्यावर विश्वास ठेवून एका सुसज्ज ॲम्बुलन्समध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठवले. रात्री साडेतीन वाजता पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या हॉस्पिटलसमोर पोहोचली. मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे. मात्र, आत बेड उपलब्ध नाहीत, असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टरच्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नसतील तर ही बाब फार गंभीर आहे. मी तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटरवर काही डॉक्टर मित्र व मी अनेक डॉक्टरच्या संपर्कात राहिलो. मात्र, रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही.

नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, किंग्ज वे हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, 'वोक्हार्ट हॉस्पिटल, सेव्हन स्टार हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये, डॉ. मुंदडा, डॉ. मरार, डॉ. अग्रवाल, सुजाता मॅडम, कावेरी मॅडम आदी डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.

नंतर वर्धा, सावंगी मेघे याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का?, तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल, नागपुरमधील दवाखाने हाउसफुल, पेशंटकडे स्वतःच्या गाड्या आहेत. अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत. असे असतांनासुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे. अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थिती पेशंटला भरती करावे लागले आहे. (विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे?, असे समजायचे का?? )

श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असतील ना? आता ह्या साखळ्या शोधून काढाव्या लागतील. मग आमच्या जीवाशी खेळायची वेळ आली तरी बेहत्तर. मात्र हा माज, ही मस्ती अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती जग सोडून गेलेल्या असतील.

आपल्या सर्वांनी मिळून आता हे संकट ओळखायला शिकलो पाहिजे. गरजवंताना मदत करा. मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रुवरसुद्धा येऊ नये."

आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या भावना या राज्यातील जनतेच्या प्रातिनिधिक भावना आहे. त्यांनी राज्यातील खाजगी दवाखान्यांच्या असंवेदनशीलता, मुजोरी, मग्रूरीचा 'पंचनमा' आपल्या पोस्टमधून केला आहे. विरोधकांच्या यासंदर्भातील आरोपांना सरकार राजकारण म्हणून दुर्लक्ष करीत असेल. मात्र, आमदार अमोल मिटकरी हे सत्तेत महत्वपूर्ण भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. योगायोगाने राज्याचं आरोग्यमंत्रीपद त्यांच्याच पक्षाच्या राजेश टोपेंकडे आहे. सरकारचे कान आपल्याच पक्षाच्या आमदारानं टोचल्यानंतरही सरकार याकडे खरंच लक्ष देणार का?, हाच खरा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
भिवंडीतील अर्जुनाळीत FDA ची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, कंपनीचा परवानाही केला निलंबित
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget