एक्स्प्लोर

आमदार जितेंद्र आव्हाडांना नगर प्रकरणाची लाज वाटते...!

एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. दुसरीकडे मात्र सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवून त्याच पक्षाच्या सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मुंबई : अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली असून जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. दुसरीकडे मात्र सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवून त्याच पक्षाच्या सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकरणाची लाज वाटत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असली तरी राष्ट्रवादीचे बडे नेते या प्रकरणी चुप्पी साधली आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांना नगर प्रकरणाची लाज वाटते...! असे असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपली भूमिका सडेतोडपणे मांडली असून नगरच्या निवडणुकीतील प्रकारची लाज वाटते असे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मेन्शन केले आहे. पत्रकार विजय चोरमारे यांच्या ट्विटला उत्तर देताना आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती.महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला? अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली आणि जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. मात्र नगरमध्ये शिवसेनेचा गेम कसा काय झाला, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली. मात्र निवडणूक गाजली, ती तिथे झालेल्या अनपेक्षित युतीमुळेच. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेचा निकाल लागला. 68 जागा असलेल्या अहमदनगरमध्ये बहुमतासाठी 35 जागांची बेगमी करावी लागते. अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली. अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना  24 राष्ट्रवादी 18 भाजप 14 काँग्रेस 5 बसपा 4 सपा 1 अपक्ष 2 पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली. अहमदनगरमध्ये कमळ कसं फुललं? भाजप            14 राष्ट्रवादी         18 बसपा             04 अपक्ष             01 एकूण            37 शिवसेनेचा गेम कसा झाला? शिवसेनेचे अहमदनगरमधील सूत्रधार अनिल राठोड हे खासदार दिलीप गांधी यांच्याशिवाय भाजपची साथ घेण्याचा अट्टाहास करत होते. त्यामुळे भाजपकडे शिवसेनेचा कोणताही अधिकृत प्रस्तावच गेला नाही. भाजपने 'आपल्याला हवा तसा' प्रस्ताव पाठवावा, असा शिवसेनेचा हट्ट होता. बहुदा भाजप तटस्थ राहील आणि बसप, तसेच तीन अपक्षांच्या साथीने आपला महापौर होईल, असा त्यांचा कयास होता. भाजपचे चाणक्य त्याचवेळी नेमकं काय करावं, या पेचात होते. भाजप आमदार शिवाजी कर्डीले गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना 'सह्याद्री'वर भेटले. आमदार कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या संपर्कात आले. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर-उपमहापौर आमचाच होईल, असा दावा केला. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सकाळी भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. भाजप नगरसेवकांच्या जोडीनेच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सभागृहात गेले. भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांना एकत्र पाहून शिवसेनेचा गेम झाला, हे उघड झालं. अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे आदेश असतानाही नगरसेवकांनी भाजपला मत का दिलं? याची चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नगरसेवकांकडून खुलासा मागितला असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे आधी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा आणि मग कारवाईचा इशारा अशी दुतोंडी भूमिका राष्ट्रवादी बजावत आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापौर निवडणुकीतली ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली आहे. देशासह राज्यात आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच राजकीय वळण घेतलं. लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होतोय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget