एक्स्प्लोर
Advertisement
काठी आणि घोंगडं घेऊन जयंत पाटील विधानसभेत
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले, तर जयंत पाटील काठी - घोंगडं घेऊन आणि फेटा घालून थेट विधानसभेत सभागृहात दाखल झाले.
नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील आज थेट काठी आणि घोंगडं घेऊन आले. धनगर आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा केली.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले, तर जयंत पाटील काठी - घोंगडं घेऊन आणि फेटा घालून थेट विधानसभेत सभागृहात दाखल झाले.
पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला.
यादरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जयंत पाटील यांच्याशी मिश्किलपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
हे तुमचं काठी घेण्याचं वय नसून, तशी वेळ तुमच्यावर येऊ नये अशी इच्छा विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केली.
मात्र धनगर समाजाला न्याय मिळत नसल्याने समाजाला हातात काठी घेण्याशिवाय पर्याय नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या
क्या हुआ तेरा वादा...? मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच गाणं वाजलं
आरक्षणासाठी मुंबईत धनगर समाजाचा मोर्चा
धनगर समाजाने मतं दिली असती, तर केंद्रात मंत्री असतो: महादेव जानकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement