एक्स्प्लोर

Jayant Patil on ED : ईडीकडून नऊ तास चौकशी, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jayant Patil : जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने त्यांची 9 तास चौकशी केली. आपण ईडीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Jayant Patil ED:  IF & LS कंपनी घोटाळा प्रकरणी ईडीकडून काल (सोमवारी) जयंत पाटील (Jayant Patil) यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ईडीकडून चौकशी झाली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिली आहे. त्यांचं समाधान होईल अशी उत्तर दिली आहेत. माझा संबधित कंपनीशी काहीही संबंध नाही, असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणांसह स्वागत केले. जयंत पाटील यांनी म्हटले की, आजच्या चौकशीनंतर ईडीकडे आता कुठलेही प्रश्न नसतील अशी अपेक्षा आहे. IF & LS कंपनीबाबत मला माहिती नाही. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले असेल. मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनीदेखील चांगली वागणूक दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच तक्रार करणार नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
 
जयंत पाटील यांनी सांगितले की, चौकशीला विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरानंतर ते टायपिंग करण्यासाठी आणि इतर कार्यालयीन कामामुळे वेळ लागला. याच दरम्यान, ईडी कार्यालयात 'शिवकालीन महाराष्ट्र' अर्ध पुस्तक वाचून झालं असल्याचे त्यांनी म्हटले.

आपला या घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केला. माझ्या कोणत्याच कंपनीने IF & LS कंपनीसोबत व्यवहार केला नाही. या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

पाहा व्हिडीओ : Jayant Patil after ED Investigation : सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली : जयंत पाटील

जयंत पाटील यांच्यावर ईडीचे आरोप काय?

  • 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं. 
  • संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. 
  • ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते.

आयएल अँड एफएस कंपनीचं प्रकरण काय?

  • IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. 
  • सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले आहेत. कंपनीचे एकूण 250 पेक्षा अधिक सब्सिडिरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत. 
  • जमिनीच्या वादात जास्त नुकसानभरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत.
  • विजय मल्ल्याच्या किंगफिशर कंपनीची परिस्थिती बिकट झाली होती. त्यांची जितकं विमानं हवेत होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त विमानं इंधनं न भरल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे पडून होती. असं असूनसुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं नाही किंवा जाणवू दिलं नाही.
  • जेव्हा कर्जाचे हप्ते फेडण्यास माल्या यांनी असमर्थता दर्शवली आणि किंगफिशर कंपनी बंद केली तेव्हा हे सगळं समोर आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashtavinayak Yatra : मोरगावचा मोरेश्वर ते पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्राElection Fast news : विधानसभा सुपरफास्ट : 18 ऑक्टोबर 2024 : abp majhaJob Majha : राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधीSillod Vidhan Sabha : सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Embed widget