(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रासाठी 'हा' निर्णय अत्यंत दुर्दैवी; फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा हल्लाबोल
Ajit Pawar : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केलीय.
मुंबई : फॉक्सकॉन प्रकल्पावरून (foxconn Semiconductor Manufacturing plant) महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसत आहे. हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या प्रकल्पावरून भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबलो केलाय. महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप अजित पवार यांनी केलाय.
"महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे." अशी टीका अजित पवार यांनी केलीय. अजित पवार यांनी ट्विट करून शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 13, 2022
"राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केलीय.
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. "हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, असे ट्विट अजित पवार यांनी केलंय.
हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 13, 2022
सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे या पूर्वी जाहीर केले होते. परंतु, हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे राज्य सरकारवर चारी बाजूंनी टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या