Ajit Pawar : अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात, स्वत:च दिली माहिती
Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टचा अपघात झल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.
पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या लिफ्टचा अपघात झल्याची माहिती समोर आली आहे. काल पुण्यात ही घटना घडल्याची माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. अजित पवार यांनी आज बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना याबाबतची माहिती दिली.
"काल एका रूग्णालयात अजित पवार गेले होते. त्यावेळी तिसऱ्या मजल्याहून चौथ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली. सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर आजच श्रद्धांजलीचां कार्यक्रम घ्यावा लागला असता, असे अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं. काल दिवसभर हे मी कुणाला सांगितलं नाही. परंतु, आज तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
Ajit Pawar : कसा झाला अपघात?
काल दिवसभरात मी दोन रूग्णालयांचं उद्घाटन केलं. त्यातील दुसऱ्या रूग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तेथून लिफ्ट थेट खाली आली. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणालाच सांगितलं नाही. माध्यमांना देखील काल याबाबतची माहिती मी दिली नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तुमच्या सर्वांच्या आर्शीवादाने मला काही झालं नाही. अशा घटना घडत असतात. या घटनेनंतर काही न झाल्याचं दाखवून मी भाषण केलं आणि घरी परतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, आज पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या कासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झाली नाही. सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. सुदैवाने यामध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे आज उद्घाटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना बोलवलं होतं. यावेळी दीप प्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली होती.
महत्वाच्या बातम्या























