Jayant Patil On Pune Rain : पुण्यातील विकास वाहून जात आहे; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं
‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
![Jayant Patil On Pune Rain : पुण्यातील विकास वाहून जात आहे; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं ncp jayant patil slams bjp over pune water logging Jayant Patil On Pune Rain : पुण्यातील विकास वाहून जात आहे; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/ebe2f724d068396927a88b0f3fda4a611666076543461442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jayant Patil On Pune Rain : ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ (Pune Rain) पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरुन वाहत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला लगावला आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यांचं काम पाण्यातून वाहत आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही टीका केली आहे. त्यासोबतच काही पुण्याच्या पावसाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली 24 तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरुन वाहत आहे. पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 18, 2022
गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. pic.twitter.com/fGJX1hPVwF
पुणे शहरात काल मुसधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ, नवी पेठ, विठ्ठल मंदिर, गणेश पेठ, डुल्यामारुती चौक, हडपसर, साधना बँकेजवळ, नारायण पेठ, कोंढवा, एनआयबीएम रोड, मार्केटयार्ड गेट नंबर दोन, नगर रोड, ढोणे बुलेटजवळ, औंध, भाऊ पाटील रोड, भवानी पेठ, आशापुरा सोसायटी या परिसरातील घरांमध्येदेखील पाणी शिरलं होतं.
मंगलदास रोड, टाटा मॅनेजमेंट जवळ, विश्रांतवाडी, विश्रांत सोसायटी, हडपसर गाडीतळ, सासवड रोड, मार्केटयार्ड गेट नंबर चार या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. काही तासांच्या पावसाने पुण्याची दाणादाण झाली होती. अनेक ठिकाणी गाड्यादेखील वाहून गेल्या.
ग्रामीण भागातही धो-धो
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुळशी,पेंढार, भोर तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शिवाय अनेकांच्या घरात देखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीच जिल्हा परिषदेच्या सीईओ आयुष प्रसाद यांनी कोणतीही अडचण आल्यास मदत मागा, आम्ही मदतीस तत्पर आहोत, असं आवाहन केलं होतं. शिवाय ग्रामीण भागातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलं होतं. वेळोवेळी कर्मचाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. वेळीच अनेक कुटुंबियांना कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवल्याने काही प्रमाणात नुकसान टळलं आहे.
संबंधित बातमी
Pune Rain: पुणेकरांच्या दिवाळी खरेदीवर पाणी! पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)