मोठी बातमी! माजी आमदार संदीप नाईकांची अखेर घरवापसी, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबईच्या (Navi Mumbai ) राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांची अखेर घरवापसी झाली आहे.
Navi Mumbai Sandeep Naik News : नवी मुंबईच्या (Navi Mumbai ) राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांची अखेर घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संदीप नाईकांचा भाजप प्रवेश संपन्न झाला आहे. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईकांची ताकद वाढणार आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून लढली होती
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव केला होता. दरम्यान, आजच दुपारीच संदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळ संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभेला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला संदीप नाईक यांचा पराभव केला होता
संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळं गणेश नाईकांची ताकद वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला संदीप नाईक यांचा पराभव केला होता.
बेलापूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार
विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, मंदा म्हात्रे यांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 5 महिन्यांनी बंडखोरी करणारे नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले होते. जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी या नगरसेवकांच्या पुनर्प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवलेला होता. मंदा म्हात्रेंच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना पक्षात घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, गणेश नाईक यांनी सूत्रे हलवत हा प्रवेश रात्री उशिरा घडवून आणला होता. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) मध्ये सामील होण्यासाठी पक्ष सोडून गेलेले नवी मुंबई भाजपचे 28 माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात परतल्याने पक्षातील काही नेते नाराज असल्याचेही बोलले जात होते. आता अशातच माजी आमदार आणि मंदा म्हात्रे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे संदीप नाईक यांनी देखील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं त्यांचे भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं, अखेर त्यांन आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























