एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : कार्यक्रम स्थळावरून थोडा गैरसमज झाला, मी कुणावर नाराज नाही; मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती 

समृद्धी महामार्गामुळे अनेक शहरांना कनेक्टिव्हिटी मिळाली असून हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्याला समृद्ध करणार महामार्ग ठरणार असल्याचे भाष्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Nashik News नाशिक : समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून मुंबईपर्यंतचा प्रवास आणखी कमी वेळेत होणार आहे. इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होऊन  अवघ्या एका तासात शिर्डीला पोहोचता येणार आहे. याशिवाय शिर्डी, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील सिन्नर, इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना देखील आपल्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगरचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

या महामार्गामुळे अनेक शहरांना कनेक्टिव्हिटी मिळाली असून हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्याला समृद्ध करणार महामार्ग ठरणार असल्याचे भाष्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. सोबतच लोकार्पण कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे रंगत असलेल्या अनेक उलटसुलट चर्चावर भाष्य करत मंत्र छगन भुजबळ यांनी या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

समृद्धी महामार्ग म्हणजे खऱ्या अर्थाने राज्याला समृद्ध करणार

भरवीर ते इगतपुरी असा समृद्ध महामार्गाच्या तिसऱ्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24. 872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी आणि  पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. यावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणले की, समृद्धी महामार्गामुळे कुठेही जायचं असेल तर हा महामार्ग एक उत्तम पर्याय आहे. सध्याघडीला इगतपुरी ते आमने पर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. पुढचे काम पूर्ण झाल्यानंतर 70 टक्के वाहतूक समृद्धीनेचे होईल. सोबतच सध्या नाशिक ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या देखील या महामार्गामुळे सुटेल. असा विश्वास देखील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बोलतांना व्यक्त केला. 

थोडा गैरसमज झाला, मी कुणावर नाराज नाही

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री छगन भुजबळ हे कार्यक्रमस्थळी उपस्थित नसल्याने अनेक चर्चा रंगतांना दिसल्या. यावर स्वत: छगन भुजबळ यांनी भाष्य करत या चर्चाना विराम दिला आहे. मी अजिबात कुणावर नाराज नाही. कार्यक्रमस्थळी मी 11 ऐवजी पावणे 11 वाजता आलो. त्यामुळे थोडा गैरसमज झाला असल्याचे भुजबळ म्हणाले. 2 वर्षांपूर्वी नितीन गडकरी साहेब नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नाशिक- मुंबई सिमेंट काँक्रिट रस्ता करणार आहोत. आता मला वाटतं एमएसआरडीसी हे काम लवकरात लवकर करावं, असे देखील भुजबळ म्हणाले.

तुतारी, हात, मशाल कोणाचेच आव्हान नाही 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांच्या चर्चेवर भाष्य करतांना  छगन भुजबळ म्हणाले की, सध्या जागावाटप संदर्भात आढावा घेतला जात आहे. आमच्या राष्ट्रवादी पक्षा तर्फे उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यांतील प्रमुख लोक भेटणार आहे. त्यानंतर आम्ही त्यावर सोबत बसून विचार करणार आहोत. कुणाची शक्ती कुठे आहे, हे सगळं पाहिलं जात आहे. आम्ही 10 जागांची मागणी केलीय, हे बरोबर आहे. मात्र अद्याप यावर व्यवस्थित चर्चा झालेली नसल्याचे भुजबळ म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघातील रस्सीखेच बघता मंत्री छगन भुजबळ यांचे देखील नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा दावा भुजबळ यांनी खोडून काढला आहे. अशी चर्चा किंवा माझे नाव त्या जागेवर असल्याचे मी तरी ऐकलं नाही. काही वेळेस मीडिया सुध्दा आपली इच्छा प्रदर्शित करत असते. राज्यात सध्या तुतारी, हात, मशाल कशाचेच आव्हान आम्हाला दिसत नाही. त्यामुळे पक्षाने सांगितले तर मी ते करेल. असे म्हणत भुजबळ यांनी महाविकास आघाडीला देखील टोला लगावला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget