व्वा, पोरी जिंकलंस... UNच्या फेलोशिपसाठी नाशिकच्या मयुरीची निवड, जगभरातून केवळ सात जण सहभागी
Nashik News: युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.
Nashik News: युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे. वर्षभर चालणाऱ्या फेलोशिपसाठी जगभरातून सात जणांची निवड करण्यात आली असून आशिया खंडातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून ती प्रतिनिधित्व करणार आहे. युनायटेड नेशन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमासाठी जगभरातून 65 हून अधिक देशांमधून सुमारे 400 उमेदवारांनी अर्ज केले. डेटा व्हॅल्यूज मोहीम तळागाळातील उमेदवारांना 2023 साठी नियोजित आखलेला कृती कार्यक्रम आहे. ही एक जागतिक चळवळ असून ज्यामध्ये 60 पेक्षा जास्त देशांतील शेकडो लोकांचा समावेश आहे आणि अधिक न्याय्य डेटा भविष्य तयार करण्यासाठी काम करत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये सुरू करण्यात आलेली ही मोहीम अर्धा दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. पुढील वर्षभरात, हे कार्यकर्ते डेटा व्हॅल्यू मोहिमेचे नेतृत्व करतील आणि इतरांना, विशेषत: उपेक्षित समुदायातील लोकांना, डेटा कसा उपयुक्त आहे आणि त्याचा अयोग्य वापर थांबावा हे पटवून देणार आहेत. साधारण वर्षभर हा प्रकल्प चालणार असून डेटा व्हॅल्यूज अॅडव्होकेट्स कार्यक्रम निवड केलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये मधील संवाद, आत्मविश्वास, नेतृत्व या सर्व गोष्टीना आकार देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
मयुरी सध्या नाशिकमध्ये शोधिनी Action Research च्या प्रोजेक्टवर काम करत असून हे काम करताना डेटा कसा महत्त्वाचा आहे. हे नेहमी लक्षात येतं. मयुरीच्या मते रिसर्च, अभ्यास हे ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे असा एक समज असतो. पण त्यामुळे तळागाळातील लोकांचे प्रश्न, त्यांची मतं, त्यांच्याकडचं ज्ञान दुर्लक्षित राहतं. डेटा वॅल्यूज प्रोजेक्ट तळागाळातलं ज्ञान, लोकसहभाग आणि डेटावर सामान्यांचा अधिकार यासाठी काम करतंय हे समजल्यावर इंटरेस्ट वाटला आणि कुठेतरी जे म्हणायचंय ते पोहचवण्यासाठी ही संधी चालून आली असल्याचं तिला वाटतं. समाजातील उपेक्षित वर्गाच्या हाल अपेष्ठा सक्षमपणे मांडण्याचे कौशल्य असल्याने प्रक्रियेत सहभागी होताना डेटा आणि सामाजिक प्रश्नांविषयीची मतं मांडली, आज सरकारी रिपोर्ट आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातली तफावत समजत असल्याने डेटाचा योग्य वापर व्हावा म्हणून वाटणारी तळमळ पोचवली म्हणून निवड झाल्याचे मयुरी सांगते. जागतिक स्तरावर पोहचून असं काम करायला मिळणारे जिथे खरा डेटा, लोकांची मतं याला महत्त्व असणारे याचा आनंद जास्त वाटतो.
युनायटेड नेशन फाऊंडेशनची डेटा वॅल्यू अॅडव्होकेट ही फेलोशिप आहे. यात जगभरातून 7 जणांची निवड झाली आहे. शाश्वत विकासाची ध्येय पूर्ण करताना माहितीचा योग्य आणि न्याय याचा वापर व्हावा यासाठी डेटा वॅल्यूज हा प्रोजेक्ट काम करतो. अनेक ठिकाणी माहिती लपवली जाते, आकडेवारी खोटी असते, त्यामुळे विविध योजना जागतिक पॉलिसी यांचा योग्य तो परिणाम साधला जात नाही. आणि हे बदलण्यासाठी जगभरातून सात लोकांची निवड केली गेली आहे. ही सात लोकं जगभरातून हिऱ्यासारखी वेचली आहेत. वेगवेगळे विषय निवडून शाश्वत विकासाची ध्येय लक्षात घेऊन फेअर डेटा फ्युचर तयार करण्यासाठी हे Advocates काम करतील. त्याद्वारे समाजातील घटकांना डेटा कसा उपयुक्त आहे? किंवा समाजाच्या उन्नतीसाठी कसा वापर करता येईल? हे महत्वाचे ठरणार आहे.
अशी असते निवड प्रक्रिया
जगभरातून अर्ज मागवले जातात. त्यानंतर या अर्जांची छाननी करून तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया केली जाते. अर्जात तुम्हाला डेटाचं सामाजिक महत्त्व किती आहे. याविषयी चाचपणी केली गेली. त्यातून निवडलेल्या लोकांसाठी एक लहान ऑनलाईन परीक्षा झाली. ज्यामध्ये दोन प्रश्नांवर उत्तराचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा असतो. व्हिडीओ ग्राह्य धरल्यास मुख्य मुलाखतीसाठी निवड करण्यात येते. त्यानंतर ऑनलाईन मुलाखत झाल्यानंतर अंतिम निवड करण्यात येते. अशा पद्धतीने अनेक अडथळे पार करून डेटा किती चांगल्याप्रकारे समाजातील उपेक्षित घटकांसाठी वापरता येईल, या बाबी पटवून देणं महत्वाचं ठरतं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI