एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, धरणंही भरली, अनेक नद्यांना पूर, बळीराजाही सुखावला

Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्हा पावसाच्या (Nashik Rain Update) प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता गेल्या दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने शेतकरी सुद्धा संकटात सापडला होता.

नाशिक : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे (Rain) दोन दिवसांपासून जोरदार आगमन झाले असून नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik dam) कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच पावसाचे पुनरागमन झाल्याने बळीराजा देखील सुखावला आहे.

नाशिक शहरासह जिल्हा पावसाच्या (nashik Rain Update) प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता गेल्या दोन महिन्यांपासून पाऊसच नसल्याने शेतकरी सुद्धा संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी तर पिकांचे मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मेहरबान होत जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची सतत दार सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नाशिकची (Nashik Rain) जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गोदावरी नदीला देखील यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर आला आहे. त्यामुळे नाशिककर देखील सुखावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पावसाची सुरू असल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे कालपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात आले आहे.

दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसत होता. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरणं कोरडीठाक होण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळेच अनेक धरणातून कालपासूनच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच, काही धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून काल दुपारपासूनच विसर्ग सुरु करण्यात आल्याने गोदावरीला (Godawari) पूर आला आहे. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने गोदावरीचे पात्र कोरडे होते, मात्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणसाठ्यात वाढ होत असल्याने विसर्ग सुरु झाला, त्यामुळे गोदावरी खळाळून वाहू लागली आहे. 

कोणत्या धरणातून किती विसर्ग?

सध्या गंगापूर धरण (Gangapur Dam) 95 टक्के, दारणा 96 टक्के, मुकणे 84 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी शंभर टक्के, कश्यपी 77 टक्के, गौतमी गोदावरी 75 टक्के, पुणेगाव 93 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 96 टक्के,  हरणबारी शंभर टक्के, केळझर 100 टक्के अशी धरण साठ्यात वाढ झाली आहे तर दारणा धरणातून आज 70 हजार 848 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर 4713 क्युसेक, कडवा 6482 क्युसेक, वालदेवी 2063 क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण धरण साठा 87 टक्के इतका आहे तर मागील वर्षी हाच धरण साठा 97 टक्के इतका होता. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik Rain : अखेर दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलं, नाशिक जिल्ह्यात वरुणराजाची आभाळमाया, गोदामाई खळाळली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? कपाटात सापडली पुस्तकांसह जादूटोण्याचे साहित्य अन् नशेचे औषधे; बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार
शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? कपाटात सापडली पुस्तकांसह जादूटोण्याचे साहित्य अन् नशेचे औषधे; बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Pune Crime News: पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
Mumbai Virar Accident: भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत
भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत, मुंबईच्या विरारमधील घटना

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Embed widget