एक्स्प्लोर

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे लाखों रुपये पाण्यात, उद्योजक निखिल पांचाल यांच्यासोबत काय घडलं? 

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या उदयॊजकांना बसत असून लाखो रुपयांचे नुकसान होतं आहे.

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गाच्या (Nashik-Mumbai Highway) दुरावस्थेबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. मात्र, हा मुद्दा केवळ पावसाळा पुरताच मर्यादित नाही. तर गेल्यानं तीन चार महिन्यापासून नाशिककरांना रस्त्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. यात परदेशात जाऊन 'मेक इन इंडिया'चा (Make In India) आवाज बुलंद करणाऱ्या नाशिकच्या उदयॊजकांना सर्वाधिक फटका बसत असून लाखो रुपयांचे नुकसान होतं आहे. 

नाशिकचे (Nashik) युवा उद्योजक, आयमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष निखिल पांचाल (Nikhil Panchal) हे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील गेल्या 44 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पांचाल इंजिनियर इंडिया प्रा.लि.चे डायरेक्टर आहेत. कामा निमित्ताने निखिल यांना कायमच मुंबई किंवा परदेशवारी करावी लागते. नाशिक-मुंबई महामार्गाच्या दर्जाबाबत सध्या ओरड होते. मात्र निखिल यांना अनेकवेळा रस्त्यावरील खड्डे, (Highway Potholes) वाहतूक कोंडीचा फटका बसला. एप्रिल महिन्यात तर त्यांचे जर्मनीचे विमानच चुकले. नाशिकहून दुपारी दोन वाजता मुंबईच्या दिशेनं निघूनही निर्धारित वेळेत विमानतळावर पोहचू न शकल्याने त्यांच्याविनाच विमानाने उड्डाण घेतले. जर्मनीत दरवर्षी  इंडस्ट्रिअल प्रदर्शन भरतं.. इंजिनियरिंग, रोबोटिक, ऑटोमोटिव्ह अशा वेगवेगळ्या विभागात काम करणारे जगभरातील  दीडशेहून अधिक उद्योजक यात सहभागी होतात.

दरम्यान प्रदर्शनाची वर्षभरापासून तयारी सुरु असते. या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी नाशिकच्या निखिल पांचाल यांना मिळाली होती. त्यावर लाखो रुपये खर्च ही केला होता आणि कोट्यवधींच्या ऑर्डरची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांचे स्वप्न नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांनी धुळीस मिळवले. तब्ब्ल आठ तास प्रवास करूनही निखिल विमानतळावर पोहचू शकले नाही. विमानासोबतच पहिल्या दिवसापासून तीन दिवसीय प्रदर्शनात सहभागी होण्याची त्यांची संधी हुकली. निखिल आणि त्यांचे इतर दोन सहकारी असे तीन जण नाशिकहून दुपारी दोन वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्याची संथ गतीने होणारी  काम, वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करत त्यानाच प्रवास सुरु झाला. ठाणे टोलनाका गाठता गाठता त्यांना तब्बल रात्रीचे आठ वाजले. तिथून पुढे मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकले आणि आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहचता पोहचता रात्रीचे दहा साडेदहा वाजले आणि जर्मनीच्या विमानाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेत. यात त्यांनी रिफ्रेशमेंटसाठी  रस्त्यात अर्धा तासाचा ब्रेक घेतला होता..

निखिल यांच्या कंपनीत वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी मशिनरी, इंजिनचे स्पेअरपार्ट बनविण्याचे काम  केले जाते.. मेक इन इंडियाचा नारा बुलंद  करण्यासाठी जागतिक नकाशावर नाशिकच्या नावाची मोहर उमटविण्यासाठी  एक वर्षापसून त्यांची तयारी सुरु होते. मात्र पहिल्या दिवशी न पोहचता निखिल आणि त्यांचे सहकारी दुसऱ्या दिवशी प्रदर्शनात पोहचले.. त्यामुळे विमान तिकिटाचे साधारण पावणेचार लाख वाया गेले. पुन्हा लाखो रुपये खर्च करून तत्काळ  तिघांचे तिकटी काढावे लागेल. नाशिकहून जे साहित्य त्यांनी जर्मनीत पाठवले होते, त्याचे एक दिवसाचे भाडे द्यावे लागले. त्याच बरोबर पहिल्या दिवशी त्यांचा स्टोल रिकामा असला तरी एका दिवसाचे साधारण पाच लाख रुपये वाया गेले. दुसऱ्या दिवशीही पूर्ण क्षमतेने स्टोल लावता आला नाही. त्यामुळे २० लाखाहून अधिक रुपये खर्च करूनही हाती काहीच आले नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन सपंण्याची वेळ अली तरीही नाशिकच्या टीमची तयारीच सुरु होती. त्यामुळे त्यांना जे मांडायचे होते, लोकांपर्यंत पोहचायचे होते ते प्राडॉक्ट पोहचू शकले नाही आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर पासून मुकावे लागले. हि संधी हुकली नसतीतर नाशिकच्या इंड्रस्टीला नवीन काम मिळाले असते. कामगारांना रोजगार मिळाला असता, देशाला परकीय चलन मिळाले असते, मात्र हे सारे नाशिक मुंबई महामार्गाने हिरावून नेले..

 तीन इंजिनाचे सरकार लक्ष घालणार का? 

एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नाशिकच्या नावाची मोहर उमटविणाची संधी केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हुकली. पहिले दोन दिवस प्रदर्शनातील स्टोल रिकामाच राहिल्यानं शरमेनं त्यांची मान खाली गेली. सादरीकरण ही करता आले नसल्याची खंत त्यांना वाटतेय. रस्ता खराब असल्यानं प्रदर्शनाला वेळेत उपस्थित राहू शकलो नाही हे सांगायचे तरी कसे असा प्रश्न त्यांना पडला होता. त्याच परदेशातून जेव्हा व्हिजिटर कंपनीत येण्यासाठी आग्रही असतात, तेव्हा त्यांना  मुंबईहून नाशिकला कसे बोलवावे हा प्रश्न त्यांच्यासह इतरही उद्योजकांना पडतोय.. कारण विमानसेवा सुरळीत नाही. रेल्वेचे वेळापत्रक आणि आंतर्राष्ट्रीय विमानसेवाचे वेळापत्रक एकमेकांना पूरक नाही आणि रस्त्यांची लाज वाटावी एवढी वाट लागली आहे. ही केवळ एका उद्योजकाची खंत नाही तर हजारो लोकांना याच समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं तीन इंजिनाचे सरकार आतातरी लक्ष घालणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik-Mumbai Highway : जर्मनीला जायचं होतं, नाशिकहून मुंबईला निघाले पण खड्ड्यांमुळे पोहोचू शकले नाही, विमान गेलं निघून.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget