Nashik Crime : नाशिकच्या गल्लोगल्लीत कोयता गँग! अंबड पोलिसांची अनोखी शक्कल, आता फक्त शेतकऱ्यांसह....
Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील मुख्य भागात गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील वाहन तोडफोडीच्या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात मुख्य भागात कोयत्यांचा सर्रासपणे गुन्हेगारांकडून वापर केला जात आहे. अशातच अंबड भागातही कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. यावर अंबड पोलिसांनी (Ambad Police) आता अनोखी शक्कल लढवली आहे. शेतकरी किंवा ज्यांना कामासाठी गरज आहे, त्यांनाच कोयता विक्री करावा असा समज विक्रेत्यांना देण्यात येणार आहे.
नाशिक शहराला लागलेला गुन्हेगारीचा (Nashik crime) कलंक मिटणार तरी कधी? असा प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बघता चिंता व्यक्त केली जात असून प्राणघातक हल्ले, लूटमार, चोऱ्या, तोडफोड या घटना तर जणू नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान गुन्हेगारीचा विषय येत्या पावसाळी अधिवेशनातही भाजप आमदारांकडून उपस्थित केला जाणार असल्याने पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी प्रयत्न तर करतायत मात्र ते कुठेतरी कमी पडत असून शिंदेंनी आता अॅक्शन मोडवर येण्याची गरज निर्माण झाली आहे..
काही दिवसांपूर्वी इन्स्ट्राग्रामवरील (Instra Reels) भाईगिरीचे रिल्स चांगलेच गाजले होते. यात नाशिकच्या (Nashik Crime) गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे रिल्स सर्रास पोस्ट, शेअर केले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता गुन्हेगारीला खतपाणी घालणारे हे रिल्स बघून खरं तर धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख बदलू तर पाहत नाहीये ना? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बघता चिंता व्यक्त केली जाते आहे. प्राणघातक हल्ले, लूटमार, चोऱ्या, तोडफोड या घटना तर जणू नित्याच्याच झाल्या असून कोयता, चॉपर सारख्या हत्यारांचा गावगुंडांकडून सर्रासपणे वापर केला जातो आहे.
नाशिकची गुन्हेगारी कधी थांबणार?
नाशिकरोड परिसरात एटीएम चोरीची घटना घडली. जणू एखाद्या घरातील सामान शिफ्टिंग केल्याप्रमाणे चोरटे थेट एटीएमच पळवत नेत आहेत तर दुसरीकडे अंबड परिसरात बुधवारी पहाटे दोन समाजकंटकांनी दारू पिऊन धिंगाणा घालत कोयता आणि लोखंडी रॉडने एक दोन नाही तर 15 चारचाकी आणि एका दुचाकीची तोडफोड केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. आज गाड्या फोडल्या, उद्या आमच्या मुलं मुलींवर वार झाले तर? आम्ही काय करायचं असा सवाल त्या उपस्थित करत आहेत. दरम्यान भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगत गृहमंत्री फडणवीसांशी देखिल चर्चा करणार असल्याचं म्हंटल आहे.
इतर संबंधित बातम्या :