(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar ZP By Election : नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम, भाजपच्या जागा घटल्या
नंदुरबार जिल्हा परिषदेवर (Nandurbar ZP By Election )काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. निवडणुकीत भाजपाला फटका बसला असून भाजपच्या 3 जागा गेल्या आहेत.
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेवर (Nandurbar ZP By Election )काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. निवडणुकीत भाजपाला फटका बसला असून भाजपच्या 3 जागा गेल्या आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष हे आधीचं समीकरण कायम राहणार आहे.
शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी यांची प्रत्येकी एक जागा वाढली
एकूण 11 जागांचे निकाल घोषित
भाजप 4
सेना 3
काँग्रेस 3
राष्ट्रवादी 1
ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागांचा तपशील
भाजप -7
काँग्रेस -2
शिवसेना -2
नंदुरबार जिल्हा परिषद 2019 चे पक्षीय बलाबल
काँग्रेस -23
भाजपा-23
शिवसेना -7
राष्ट्रवादी -3
एकूण- 56
Akola ZP By Election : अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितची सरशी पण सत्ता कायम ठेवण्याचा रस्ता कठिणच!
जिल्हा परिषद आजच्या निकालानंतरचे पक्षीय बलाबल
काँग्रेस 24
भाजप 20
शिवसेना 8
राष्ट्रवादी 4
एकूण जागा 56
Palghar ZP By Election : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर पंचायत समिती निवडणुकीतही धोबीपछाड
नंदुरबार आणि शहादा पंचायत समितीत भाजपने सत्ता गमावली आहे. शिवसेना आणि काँग्रेसने दोन्ही समितीवर झेंडा फडकवला आहे. शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालं आहे. पोट निवडणुकीत 5 पैकी 4 गणात शिवसेना उमेदवार विजयी. शिवसेनेचे नंदुरबार पंचायत समिती मध्ये आता 11 सदस्य तर भाजपाचे 9 सदस्य झाले आहेत. शहादा पंचायत समिती वर काँग्रेसची सत्ता आली आहे. भाजपाकडून पंचायत समिती आता काँग्रेसकडे जाणार आहे. शहादा पंचायत समितीतील आताचे संख्याबळ काँग्रेस 15, राष्ट्रवादी 1 भाजपा 12 असं आहे
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले होते.. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.
जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी :
धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.